मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात आज आरसीबी ( Royal Challengers Bangalore ) आणि कोलकाता (Kolkata Knight Riders) हे संघ आमनेसामने आहेत. हा सामना डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई येथे खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाचा डाव 18.5 षटकांत सर्वबाद 128 धावांवर गुंडाळला गेला आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंघळुरु संघाला विजयसाठी 129 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
-
Innings Break!
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Brilliant bowling effort from #RCB as #KKR are bowled out for 128 in 18.5 overs.
Hasaranga (4/20), Harshal (2/11)
Scorecard - https://t.co/BVieVfFKPu #RCBvKKR #TATAIPL pic.twitter.com/A22NVk04bW
">Innings Break!
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2022
Brilliant bowling effort from #RCB as #KKR are bowled out for 128 in 18.5 overs.
Hasaranga (4/20), Harshal (2/11)
Scorecard - https://t.co/BVieVfFKPu #RCBvKKR #TATAIPL pic.twitter.com/A22NVk04bWInnings Break!
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2022
Brilliant bowling effort from #RCB as #KKR are bowled out for 128 in 18.5 overs.
Hasaranga (4/20), Harshal (2/11)
Scorecard - https://t.co/BVieVfFKPu #RCBvKKR #TATAIPL pic.twitter.com/A22NVk04bW
प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या केकेआर संघाची सुरुवात खराब झाली. संघाला पहिला धक्का व्यंकटेश अय्यरच्या (13) रुपाने 14 धावांवर बसला. त्यानंतर मागील सामन्यात शानदार कामगिरी करणारा अजिंक्य रहाणे काही खास कामगिरी करु शकला नाही. तो वैयक्तिक 9 धावांवर परतला. तसेच ही सलामी जोडी बाद झाल्यानंतर आलेला नितेश राणा (10) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (13) जलद बाद झाले. त्यामुळे केकेआरचा संघ चांगला अडचणीत सापडला. त्यानंतर ही सातत्याने विकेट्स पडत राहिल्या.
-
Wicket No.2 for Wanindu Hasaranga.
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Sunil Narine departs for 12.
Live - https://t.co/BVieVfFKPu #RCBvKKR #TATAIPL pic.twitter.com/BbTq8WfKNf
">Wicket No.2 for Wanindu Hasaranga.
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2022
Sunil Narine departs for 12.
Live - https://t.co/BVieVfFKPu #RCBvKKR #TATAIPL pic.twitter.com/BbTq8WfKNfWicket No.2 for Wanindu Hasaranga.
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2022
Sunil Narine departs for 12.
Live - https://t.co/BVieVfFKPu #RCBvKKR #TATAIPL pic.twitter.com/BbTq8WfKNf
कोलकाता संघाकडून सर्वाधिक धावा आंद्रे रसेल (25) आणि उमेश यादवने (18) केल्या. तसेच कोलकाता नाईट रायडर्स संघाचा डाव 18.5 षटकांत सर्वबाद 128 धावांवर गुंडाळला गेला. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंघळुरु संघाला विजयसाठी 129 धावांचे लक्ष्य मिळाले.रॉयल चॅलेंजर्स बंघळुरु संघाकडून गोलंदाजी करताना सामन्यात वानिंदू हसरंगाने (4/20) सर्वाधिक विकेट्स घेतल्या त्याचबरोबर आकाश दीपने 3 आणि हर्षल पटेलने 2 विकेटस् घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने एक विकेट्स घेतली.
-
#KKR lose three wickets in the powerplay. Akash Deep with the wickets of Venkatesh Iyer and Nitish Rana.
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/BVieVfFKPu #RCBvKKR #TATAIPL pic.twitter.com/CRg72jDPNT
">#KKR lose three wickets in the powerplay. Akash Deep with the wickets of Venkatesh Iyer and Nitish Rana.
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2022
Live - https://t.co/BVieVfFKPu #RCBvKKR #TATAIPL pic.twitter.com/CRg72jDPNT#KKR lose three wickets in the powerplay. Akash Deep with the wickets of Venkatesh Iyer and Nitish Rana.
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2022
Live - https://t.co/BVieVfFKPu #RCBvKKR #TATAIPL pic.twitter.com/CRg72jDPNT
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाणेफेक जिंकून ( Royal Challengers Bangalore won the toss ) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स वगळता एका ही संघाला धावांचा बचाव करता आलेला नाही. आतापर्यंत आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पाच सामने पार पडले असून प्रत्येक संघाने प्रत्येकी एक सामना खेळला आहे.
-
Let's Play 🤝
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/BVieVfFKPu #RCBvKKR #TATAIPL pic.twitter.com/uBrmVlxyfK
">Let's Play 🤝
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2022
Live - https://t.co/BVieVfFKPu #RCBvKKR #TATAIPL pic.twitter.com/uBrmVlxyfKLet's Play 🤝
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2022
Live - https://t.co/BVieVfFKPu #RCBvKKR #TATAIPL pic.twitter.com/uBrmVlxyfK
बंगळुरू आणि कोलकाता संघांच्या हेड-टू-हेड आकडेवारीबद्दल बोलायचे तर, आयपीएलमध्ये बंगळुरू आणि कोलकाता संघात एकूण 29 सामन्यांत एकमेकांसमोर आले आहेत. या 29 सामन्यांपैकी केकेआरने 16 सामने जिंकले आहेत, तर आरसीबीने 13 सामने जिंकले आहेत. या दृष्टीने केकेआरच्या संघाचा वरचष्मा दिसत असून, पहिल्या सामन्यात केकेआरने ज्याप्रकारे कामगिरी केली, त्यानुसार हा सामना जिंकण्यासाठी आरसीबीला अधिक मेहनत करावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, शेरफेन रदरफोर्ड, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
केकेआर प्लेइंग इलेव्हन : व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), उमेश यादव, शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती.
हेही वाचा - Ipl 2022 Srh Vs Rr: सामना दर सामना रणनीती बनवणार संजू सॅमसन