ETV Bharat / sports

SRH vs RR: 'IPL'च्या 5 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून हैदराबादचा 61 धावांनी पराभव - latest cricket news

आयपीएलच्या 5 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. मंगळवारी सायंकाळी झालेल्या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. (Rajasthan Royals beat Hyderabad) हा निर्णय हैदराबादसाठी पराभवाकडे घेऊन जाणारा ठरला.

राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 61 धावांनी पराभव

author img

By

Published : Mar 29, 2022, 10:58 PM IST

Updated : Mar 30, 2022, 9:11 AM IST

पुणे - राजस्थान रॉयल्सने आपल्या पहिल्याच सामन्यात या आयपीएलमधील मोठा विजय मिळवला आहे. आयपीएलमधील या संघाने पहिल्याच सामन्यात हैदराबादचा धुव्वा उडवला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २१० धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला सुरुवातीपासूनच जोरदार धक्के बसले. (SRH vs RR) शेवटी त्यांना ६१ धावांनी मोठा पराभव स्विकारावा लागला. यंदाच्या आयपीएलधील हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे.

राजस्थानला पहिला धक्का बसला - राजस्थानच्या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला दुसऱ्याच षटकात कर्णधार केन विल्यम्सचा मोठा धक्का बसला. या धक्क्यातून हैदराबादचा संघ सावरू शकला नाही आणि त्यांना पराभव स्विकारावा लागला. सुरूवातीला राजस्थानने यावेळी सावध पवित्रा घेतला होता. (Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad Match) पण स्थिरस्थावर झाल्यावर मात्र त्यांनी फटकेबाजीवर भर दिला. राजस्थानच्या जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांनी यावेळी ५८ धावांची दमदार सलामी दिली. यशस्वी यावेळी २० धावांवर बाद झाला आणि राजस्थानला पहिला धक्का बसला.

बटलर बाद झाल्यावर पडीक्कल फलंदाजीला आला - यशस्वीनंतर कर्णधार संजू सॅमसन फलंदजाीला आला. त्यावेळी राजस्थानच्या संघाने प्लॅन बदलल्याचेच यावेळी पाहायला मिळाले. संजू फलंदाजीला आल्यावर राजस्थानच्या धावांचा वेग वाढायला सुरुवात झाली. पण त्यावेळी राजस्थानला जोस बटलरच्या रुपात दुसरा धक्का बसला. बटलरने यावेळी तीन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ३५ धावांची दमदार खेळी साकारली. बटलर बाद झाल्यावर देवदत्त पडीक्कल फलंदाजीला आला आणि त्याच्याबरोबर संजूने हैदराबादच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला.

२५ चेंडूंत षटकारासह अर्धशतक पूर्ण केले - संजू आणि देवदत्त यांनी दमदार फलंदाजीचा नुमना पेश केला. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी साकारली. पण पडीक्कल यावेळी बाद झाला आणि ही जोडी फुटली. पडीक्कलने यावेळी २९ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटाकारांच्या जोरावर ४१ धावांची खेळी साकारली. पडीक्कल बाद झाल्यार संजूने आपली धडाकेबाज फटकेबाजी सुरुच ठेवली आणि २५ चेंडूंत षटकारासह अर्धशतक पूर्ण केले.

दोनशे धावांचा पल्ला गाठता आला - संजूने अर्धशतक झळकावल्यावर संजू जास्त काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. संजूने यावेळी २७ चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ५५ धावांची वादळी खेळी साकारली. संजूला यावेळी अन्य फलंदाजांची चांगली साथ मिळाली. त्यामुळेच राजस्थानला या सामन्यात दोनशे धावांचा पल्ला गाठता आला. तसेच हा सर्वात मोठा त्याना विजय मिळवता आला.

हेही वाचा - Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचे वृत! म्हणाले, सामना वाचायचा नाही अन् राऊतांवर बोलायच नाही

Last Updated : Mar 30, 2022, 9:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.