मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL ) पंधराव्या हंगामातील 38 वा सामना सोमवारी वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला सुरु होईल. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज ( Chennai Super Kings vs Punjab Kings ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघाचा हंगामातील आठवा सामना असणार आहे. या अगोदर या हंगामतील 11 वा सामना दोन्ही संघात झाला होता. ज्यामध्ये पंजाब किंग्सने सीएसकेवर 54 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे चेन्नईचा संघ हा बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
-
Wait for it… and Strike! 💥
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The Ro-aR combo!🦁#PBKSvCSK #WhistlePodu #Yellove 💛 pic.twitter.com/4CTlUwjY8K
">Wait for it… and Strike! 💥
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 25, 2022
The Ro-aR combo!🦁#PBKSvCSK #WhistlePodu #Yellove 💛 pic.twitter.com/4CTlUwjY8KWait for it… and Strike! 💥
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 25, 2022
The Ro-aR combo!🦁#PBKSvCSK #WhistlePodu #Yellove 💛 pic.twitter.com/4CTlUwjY8K
चेन्नई संघाने ( Chennai Super Kings Team ) मागील सामन्यात मुंबईवर विजय मिळवला होता, त्यामुळे चेन्नई संघ आपल्या पहिल्या रुपात असल्याचे दिसत आहे. चेन्नई संघाने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात विजय तर पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ चार गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानी आहेत. दुसरीकडे पंजाब संघाला ( Punjab Kings Team ) आपल्या मागील सामन्यात दिल्लीकडून 9 विकेट्सने दारुन पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच या संघाने आपल्या सात सामन्यात तीन विजय आणि चार पराभव पत्कारले आहेत. म्हणून हा संघ गुणतालिकेत सहा गुणांसह आठव्या स्थानी आहेत. तसेच आयपीएलच्या संपूर्ण इतिहासात या दोन्ही संघात एकूण 26 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्यील पंधरा सामन्यात सीएसकेने बाजी मारली आहे. तसेच अकरा सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे.
ड्वेन ब्राव्हो आणि शिखर धवन आमने-सामने - आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्हो ( Bowler Dwayne Bravo ) याने या हंगामात चेन्नईसाठी आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. शिखर धवनची ( Batsman Shikhar Dhawan ) विकेट लवकरात लवकर मिळवण्याचा ब्राव्हो प्रयत्न करेल. ब्राव्होने आतापर्यंत तीनदा धवनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. यादरम्यान धवनने ब्राव्होविरुद्ध 73 चेंडूत 112 धावा केल्या आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील पहिल्या सामन्यात धवनने 33 धावा केल्या आणि ब्राव्होविरुद्ध बाद झाला.
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा (कर्णधार), मोईन अली, रुतुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर, अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा, मिचेल सँटनर, ख्रिस जॉर्डन, अॅडम मिल्ने, डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, महेश तिक्षना, राजवर्धन हंगरगेकर, तुषार देशपांडे, केएम आसिफ, सी हरी निशांत, एन जगदीसन, सुब्रांशू सेनापती, के भगत वर्मा, प्रशांत सोलंकी, सिमरजित सिंग आणि मुकेश चौधरी.
पंजाब किंग्ज : शिखर धवन, मयंक अग्रवाल (कर्णधार), अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, एम शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, हृतिक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे आणि बेनी हॉवेल.