ETV Bharat / sports

IPL 2022 DC vs PBKS : नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; 'अशी' आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन - Punjab Kings opt to bowl

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 64 वा सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( DC vs PBKS ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला डॉ. डी. व्हाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. हा सामना दोन्ही संघाच्या प्लेऑफच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होणार यामध्ये काही शंका नाही.

DC vs PBKS
DC vs PBKS
author img

By

Published : May 16, 2022, 7:39 PM IST

मुंबईः इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 64 वा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Punjab Kings vs Delhi Capitals ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला सोमवारी (16 मे) डॉ. डी. व्हाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक पार पडली. पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

पंजाबचा संघ ( Punjab Kings Team ) 12 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर असून त्यांचा निव्वळ त्यांचा नेट रन रेट दिल्ली पेक्षा कमी आहे. त्यांचा नेट रन रेट 0.023 आहे. दिल्लीच्या संघाचे देखील 12 गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट 0.210 चांगला असल्याने पाचव्या स्थानी आहे. ज्यामुळे दोन किंवा अधिक संघांचे समान गुण असल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध आठ गडी राखून विजय मिळवल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघ अधिक आत्मविश्वासाने सामन्यात प्रवेश करेल. तर पंजाब किंग्जनेही शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला आहे.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, सर्फराज खान, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे आणि खलील अहमद.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल (कर्णधार), जितेश शर्मा, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

हेही वाचा - Ipl 2022 Updates : राजस्थान रॉयल्स संघासाठी आनंदाची बातमी; बाळाच्या जन्मानंतर शिमरन हेटमायर परतला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.