मुंबई: मंगळवारी (17 मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad ) संघात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 65 वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स फक्त औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मैदनात उतरेल. त्याचबरोबर हा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
मुंबईने 12 पैकी तीन सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून सर्वात पहिल्यांदा बाहेर पडला आहे. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादने 12 पैकी पाच सामने जिंकले आहेत. तसेच संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. रोहित शर्माचा ( Captain Rohit Sharma ) संघ शेवटपर्यंत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल, तर केन विल्यमसन आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करेल.
-
This combination of left and right brings with it fire and might. 💪🏾🔥@Natarajan_91 | #JammuExpress | #MIvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/I4TV1lt9uy
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">This combination of left and right brings with it fire and might. 💪🏾🔥@Natarajan_91 | #JammuExpress | #MIvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/I4TV1lt9uy
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 17, 2022This combination of left and right brings with it fire and might. 💪🏾🔥@Natarajan_91 | #JammuExpress | #MIvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/I4TV1lt9uy
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 17, 2022
मुंबईसाठी या हंगामात मोजक्याच फलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली असून युवा फलंदाज तिलक वर्माचे ( Batsman Tilak Verma ) नाव आघाडीवर आहे. टीम डेव्हिडनेही संघात पुन्हा समावेश झाल्यापासून शानदार खेळी खेळली आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि डॅनियल सॅम्स यांनी चांगली कामगिरी केली आहे. हैदराबादसाठी राहुल त्रिपाठी आणि एडन मार्कराम यांनी सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर पॉवरप्लेमध्ये अभिषेक शर्मानेही उपयुक्त खेळी केली आहे. गोलंदाजीत उमरान मलिकवर सर्वांच्या नजरा असतील.
-
Congratulations to Tristan Stubbs who has received his maiden call-up to the Proteas squad for the upcoming T20I series against India 👏
— Mumbai Indians (@mipaltan) May 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Wishing you all the luck, Tristan! 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians pic.twitter.com/Dew6vq6hMS
">Congratulations to Tristan Stubbs who has received his maiden call-up to the Proteas squad for the upcoming T20I series against India 👏
— Mumbai Indians (@mipaltan) May 17, 2022
Wishing you all the luck, Tristan! 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians pic.twitter.com/Dew6vq6hMSCongratulations to Tristan Stubbs who has received his maiden call-up to the Proteas squad for the upcoming T20I series against India 👏
— Mumbai Indians (@mipaltan) May 17, 2022
Wishing you all the luck, Tristan! 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians pic.twitter.com/Dew6vq6hMS
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, बेसिल थंपी, हृतिक शोकीन, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, टायमल मिल्स , अर्शद खान, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, फॅबियन ऍलन, किरॉन पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयाल आणि इशान किशन.
सनरायझर्स हैदराबाद : केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, आर समर्थ, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रोमॅरियो शेफर्ड, मार्को यान्सन, जे सुचित , श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन अॅबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फजलहक फारुकी, उमरान मलिक आणि टी नटराजन.