ETV Bharat / sports

IPL 2022 MI vs SRH : नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; हैदराबाद फलंदाजीसाठी सज्ज

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 65 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या दृष्टीने फक्त औपचारिकता आहे, तर हैदराबादच्या हा सामना खुप महत्वाचा आहे.

MI vs SRH
MI vs SRH
author img

By

Published : May 17, 2022, 7:27 PM IST

मुंबई: मंगळवारी (17 मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad ) संघात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 65 वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार रोहित शर्मा आणि केन विल्यम्सन यांच्यात नाणेफेक पार पडली. नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्स संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत, सनरायझर्स हैदराबाद संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्स फक्त औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मैदनात उतरेल. त्याचबरोबर हा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. मुंबईने आतापर्यंत 12 पैकी तीन सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून सर्वात पहिल्यांदा बाहेर पडला आहे. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादने 12 पैकी पाच सामने जिंकले आहेत. तसेच संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. रोहित शर्माचा ( Captain Rohit Sharma ) संघ शेवटपर्यंत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल, तर केन विल्यमसन आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करेल.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, उमरान मलिक आणि टी नटराजन.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), डॅनियल सॅम्स, टिळक वर्मा, रमणदीप सिंग, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, संजय यादव, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ आणि मयंक मार्कंडे.

हेही वाचा - Sa Tour Of Ind : भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा टी 20 संघ जाहीर; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.