कोलकाता: इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील एलिमेनेटर सामना बुधवारी (25 मे) ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants ) संघात पार पडणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघाची धुरा फाफ डु प्लेसिस आणि केएल राहुलच्या खांद्यावर असणार आहे.
-
The calm before the storm. 😉
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
See you on the field tomorrow, @LucknowIPL! 🤜🏻🤛🏻#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #PlayOffs #LSGvRCB pic.twitter.com/rDGmGHaBI0
">The calm before the storm. 😉
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 24, 2022
See you on the field tomorrow, @LucknowIPL! 🤜🏻🤛🏻#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #PlayOffs #LSGvRCB pic.twitter.com/rDGmGHaBI0The calm before the storm. 😉
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 24, 2022
See you on the field tomorrow, @LucknowIPL! 🤜🏻🤛🏻#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #PlayOffs #LSGvRCB pic.twitter.com/rDGmGHaBI0
लखनौ संघाने ( Lucknow Super Giants ) साखळी फेरीत 14 पैकी 9 सामने जिंकून 18 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने 14 पैकी 8 सामने जिंकले होते आणि त्यांना दिल्लीच्या पराभवानंतर प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी मिळाली. लखनौचा संघ आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात विजय नोंदवत प्लेऑफमध्ये पोहोचला. या सामन्यात संघाच्या गोलंदाजांची भूमिका खूप महत्त्वाची ठरू शकते. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फलंदाजी मजबूत आहे आणि लखनौला विजय नोंदवायचा असेल तर त्यांच्या फलंदाजीला रोखावे लागेल. आरसीबीच्या संघात उजव्या हाताचे अनेक फलंदाज आहेत आणि अशा परिस्थितीत डावखुरा गोलंदाज असलेल्या मोहसीन खानची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
-
Eliminator ready #SuperGiants 👊🔥Let’s get this one #SuperFam💙#AbApniBaariHai💪 #IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 pic.twitter.com/ZrgCfLErmM
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Eliminator ready #SuperGiants 👊🔥Let’s get this one #SuperFam💙#AbApniBaariHai💪 #IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 pic.twitter.com/ZrgCfLErmM
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 25, 2022Eliminator ready #SuperGiants 👊🔥Let’s get this one #SuperFam💙#AbApniBaariHai💪 #IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 pic.twitter.com/ZrgCfLErmM
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 25, 2022
या युवा गोलंदाजाने आतापर्यंत स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली असून एलिमिनेटर सामन्यातही त्याच्याकडून अशीच कामगिरी अपेक्षित आहे. संघासाठी, केवळ कर्णधार केएल राहुल, क्विंटन डी कॉक आणि दीपक हुडा यांनी आतापर्यंत बहुतेक प्रसंगी योगदान दिले आहे. अशा स्थितीत या सामन्यातील इतर फलंदाजांनीही फलंदाजीच्या जोरावर पुढे जाऊन जबाबदारी स्वीकारणे अपेक्षित आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( Royal Challengers Bangalore ) त्यांचा शेवटचा साखळी सामनाही जिंकला आणि संघासाठी सर्वात चांगली बातमी म्हणजे विराट कोहलीचे फॉर्ममध्ये परतणे. प्लेऑफच्या महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी विराटने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यामुळे आरसीबीचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. याशिवाय फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यांनीही अनेक अप्रतिम खेळी खेळल्या आहेत आणि त्यांना लखनौच्या गोलंदाजांविरुद्ध त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करायला आवडेल. मात्र, मागील सामन्यात मोहम्मद सिराजच्या जागी सिद्धार्थ कौलला खेळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने संघासाठी गोलंदाजीमध्ये काही प्रमाणात चिंतेचे वातावरण असेल पण तोही अपयशी ठरला. अशा स्थितीत संघ सिराजला पुन्हा एकदा संधी देऊ शकतो.
लखनौ सुपर जायंट्स संघ: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कर्णधार), एविन लुईस, दीपक हुडा, मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, मोहसीन खान, आवेश खान, रवी बिश्नोई, मनीष पांडे, कृणाल पांड्या , आयुष बडोनी, शाहबाज नदीम, दुष्मंथा चमीरा, काइल मेयर्स, अंकित राजपूत, अँड्र्यू टाय, करण शर्मा आणि मयंक यादव.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, सिद्धार्थ कौल, जोश हेजलवूड, मोहम्मद सिराज, आकाश दीप , कर्ण शर्मा, डेव्हिड विली, जेसन बेहरेनडॉर्फ, चामा व्ही मिलिंद, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, शेरफेन रदरफोर्ड आणि अनिश्वर गौतम.
हेही वाचा - Nikhat Zareen Interview : देशातील सर्व मुलींना निखतने दिला 'हा' मंत्र; पाहा व्हिडिओ