ETV Bharat / sports

IPL 2022 LSG vs CSK: नाणेफेक जिंकून लखनौ सुपरजायंट्स संघाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; सीएसके आणि एलएलजी संघात प्रत्येकी एक बदल - कर्णधार केएल राहुल

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) मधील सातवा सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स खेळला जात आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकून केएल राहुलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Lucknow Super Giants opt to bowl ) आहे. त्यामुळे रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.

LSG vs CSK
LSG vs CSK
author img

By

Published : Mar 31, 2022, 7:21 PM IST

मुंबई: इंडियन प्रीमीयर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामातील सातवा सामना बेब्रॉन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना यंदा आयपीएल स्पर्धेत नव्याने सहभागी झालेल्या लखनौ सुपरजायंट्स संघा विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स ( CSK vs LSG ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकून लखनौ सुपरजायंट्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Lucknow Super Giants opt to bowl )आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्स संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

चेन्नई संघ ( Chennai Super Kings ) आपला नवीन कर्णधार रवींद्र जडेजाच्या ( Captain Ravindra Jadeja ) नेतृत्वाखालील दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आज खेळल्या जात असलेल्या सामन्यात सीएसके संघाने काही बदल केले आहेत. सीएसकेने आज अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. या संघाला पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या हातून पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे हा संघ आज आपले दोन गुण मिळवण्यासाठी संघर्ष करणार आहे.

लखनौ सुपर जायंट्सची ( Lucknow Super Giants ) धुरा कर्णधार केएल राहुलच्या ( Captain KL Rahul ) खांद्यावर आहे. त्याचबरोबर त्यांना या सामन्यात बलाढ्य चेन्नईसंघाचे आव्हान पेलावे लागणार आहे. कारण चेन्नई संघात माजी कर्णधार एम एस धोनी आणि बरेच दिग्गज खेळाडू आहे. तसेच मागील सामन्यातील युवा फलंदाज आयुष बदोनीवर पुन्हा एकदा लक्ष्य असणार आहे. आज वेगवान गोलंदाज अँड्र्यू टायचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. या व्यतिरिक्त संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी आणि तुषार देशपांडे.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, दुष्मंथा चमीरा, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई आणि आवेश खान.

हेही वाचा - IPL 2022 LSG vs CSK: सीएसके पहिल्या विजयाच्या शोधात; एलएसजीसोबत आज आमनेसामने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.