हैदराबाद : गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) चे पदार्पणाच्या हंगामात आयपीएलचे विजेतेपद मिळवण्याची स्वप्न रविवारी सत्यात उतरले आहे. त्यांनी राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals ) 7 विकेट्सने पराभव करत पहिल्यांदाच आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले.
गुजरात टायटन्स सातत्याने गुणतालिकेत पहिल्या 2 स्थानांवर आपले वर्चस्व कायम राखले. तसेच राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडूकडे कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला अडचणीत आणण्यासाठी पुरेसे मॅच-विनर्स होते. तरी देखील त्यांनी गुजराच टायटन्सने नमवत जेतेपद ( Gujarat Titans First Time Champion ) पटकावले.
हा विजय हार्दिक पांड्याचा या फ्रँचायझीसह पाचवा आयपीएल विजय होता. कर्णधार म्हणून त्याने प्रथमच विजेतेपद पटकावल्याने हा मोसम खास होता. जीटीच्या विजयापूर्वी हार्दिक पांड्या चार वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians Team ) संघाचा भाग होता.
ही राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स मधील खेळाडूंची यादी आहे, जे आधीपासून आयपीएल विजेत्या संघांचा ( Already part of IPL winning squads ) भाग आहेत.
खेळाडू | संघ | वर्ष |
हार्दिक पांड्या (सध्या गुजरात टायटन्स) | मुंबई इंडियन्स (MI) | 2015, 2017, 2019, 2020 |
ट्रेंट बोल्ट (राजस्थान रॉयल्स) | सनरायझर्स हैदराबाद (SRH), मुंबई इंडियन्स (MI) | 2016, 2020 |
रविचंद्रन अश्विन (राजस्थान रॉयल्स) | चेन्नई सुपर किंग्ज (CSK) | 2010, 2011 |
युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स) | मुंबई इंडियन्स (MI) | 2013 |
जोस बटलर (राजस्थान रॉयल्स) | मुंबई इंडियन्स (MI) | 2017 |
अल्झारी शाहीम जोसेफ (गुजरात टायटन्स) | मुंबई इंडियन्स (MI) | 2019 |
ऋद्धिमान साहा (गुजरात टायटन्स) | चेन्नई सुपर किंग्ज (CSK) | 2011 |
हेही वाचा - Ipl 2022 Big Jersey: आयपीएल 2022 समारोप सोहळ्यात लॉन्च केली सर्वात मोठी आयपीएल जर्सी