ETV Bharat / sports

IPL 2022 DC vs KKR : दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाइट रायडर्सवर 44 धावांनी विजय; वार्नर-यादवचे दमदार प्रदर्शन

author img

By

Published : Apr 10, 2022, 9:20 PM IST

आयपीएल 2022 मधील एकोणीसावा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स ( DC vs KKR ) संघात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने कोलकाता संघावर 44 धावांनी विजय मिळवला.

DC vs KKR
DC vs KKR

मुंबई: रविवारी (10एप्रिल) आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एकोणीसावा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स ( Delhi Capitals vs Kolkata Knight Riders ) आमनेसामने आले होते. हा सामना दिल्ली संघाने कोलकातावर 44 धावांनी ( Delhi Capitals won by 44 runs ) मात करत जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, दिल्लीने कोलकात्याला 216 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात कोलकात्याचा संघ सर्वबाद 171 धावाच करु शकला.

पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नरने ( David Warner ) दिल्ली कॅपिटल्सला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पुन्हा एकदा अर्धशतकी भागीदारी केली आणि पॉवरप्लेमध्ये दिल्लीची धावसंख्या 68-0 अशी झाली. शॉने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. तो 29 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 51 धावा करून बाद झाला. येथून ऋषभ पंतने (13 चेंडूत 27 धावा) धावांचा वेग कमी होऊ दिला नाही आणि त्याने वॉर्नरसह संघाची धावसंख्या 150 च्या जवळ नेली. त्यानंतर पंत 148 धावांवर बाद झाला.

येथून दिल्ली कॅपिटल्सची ( Delhi Capitals ) फलंदाजी ढासळली आणि त्यांची मधली फळी फ्लॉप ठरली झाली. ललित यादव आणि रोवमन पॉवेल फार काही करू शकले नाहीत. वॉर्नरही 17व्या षटकात 166 सांघिक धावसंख्येवर बाद झाला. वॉर्नरने 45 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सला एकवेळ 200 धावांचा टप्पा पार करणे कठीण वाटत होते, पण शार्दुल ठाकूर (11 चेंडूत 29* धावा, एक चौकार आणि 3 षटकार) आणि अक्षर पटेल (14 चेंडूत 22* धावा) यांनी वेगवान खेळ करत धावसंख्या दोनशेच्या पार पोहचवली. दिल्लीने शेवटच्या 5 षटकात 54 धावा केल्या. तसेच कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नरेनने 2, आंद्रे रसेल, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

216 धावांचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्येच त्यांनी आपले दोन्ही सलामीवीर व्यंकटेश अय्यर ( Opener Venkatesh Iyer ) आणि अजिंक्य रहाणे गमावले. येथून कर्णधार श्रेयस अय्यर आणि नितीश राणा (20 चेंडूत 30 धावा, 3 षटकार) यांनी 69 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत, सामन्यात आपला संघ कायम ठेवला. श्रेयस अय्यरने (33 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 54 धावा) अर्धशतक झळकावले, पण लागोपाठच्या षटकांत दोन्ही फलंदाज बाद करून दिल्लीने सामन्यावर ताबा मिळवला. वेगवान खेळी करत असलेला सॅम बिलिंग्जही 9 चेंडूत 15 धावा काढून बाद झाला.

शेवटच्या 5 षटकात केकेआरला विजयासाठी 79 धावांची गरज होती. पॅट कमिन्स (5), सुनील नरेन (4) आणि उमेश यादव (0) यांना त्याच षटकात बाद करत कुलदीप यादवने ( Spinner Kuldeep Yadav ) केकेआरला तिहेरी धक्का दिला. आंद्रे रसेल निश्चितपणे एका टोकाला उभा होता, पण धावगती इतकी वाढली होती की, त्याच्यासाठी धावा काढणे कठीण झाले होते. त्यांनी केवळ पराभवाचे अंतर कमी करण्याचे काम केले. शेवटच्या षटकात 21 चेंडूत 24 धावा करून तो बाद झाला. अखेर केकेआरचा संघ 19.4 षटकात 171 धावांवर सर्वबाद झाला. दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4, खलील अहमदने 3, शार्दुल ठाकूरने 2 आणि ललित यादवने एक विकेट घेतली.

हेही वाचा - Ipl 2022 Rr Vs Lsg : नाणेफेक जिंकून लखनौ सुपरजायंट्सचा गोलंदाजीचा निर्णय; 'अशी' आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.