ETV Bharat / sports

KL Rahul Statement : आम्ही चौकार आणि षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण... - केएल राहुल - आयपीएलच्या बातम्या

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कडून 14 धावांनी पराभूत झाल्यानंतर लखनौ सुपर जायंट्स (LSG) स्पर्धेतून बाहेर पडला. या सामन्यात लखनौला विजयासाठी 208 धावांचे लक्ष्य मिळाले होते, प्रत्युत्तरात संघ 193 धावाच करू शकला. केएल राहुलच्या 79 धावांच्या खेळीशिवाय कोणताही खेळाडू विशेष काही करू शकला नाही. या सामन्यात लखनौच्या क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीतही बराच हलगर्जीपणा दिसून आला.

KL Rahul
KL Rahul
author img

By

Published : May 26, 2022, 5:30 PM IST

कोलकाता: लखनौ सुपर जायंट्स संघाला एलिमिनेटेर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ) संघाकडून 14 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या सामन्यातील परभवानंतर कर्णधार केएल राहुलने प्रतिक्रिया ( Captain KL Rahul reaction ) दिली आहे. त्यावेळी त्याने मान्य केले की, त्याच्या संघाला मधल्या षटकांमध्ये दोन मोठे फटके हवे होते. मधल्या षटकांमध्ये दोन मोठे शॉट्स खेळलो असतो, तर सामन्याचे चित्र बदलू शकले असते.

पॉवर प्लेनंतरच्या सात षटकांमध्ये राहुलला फक्त एक चौकार मारता आला, तर तो इतका सक्षम फलंदाज आहे की तो जगातील कोणत्याही गोलंदाजीचा पर्दाफाश करू शकतो. या मोसमात त्याने दोन शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत, मात्र पाठलाग करताना त्याला फलंदाजीवर कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. लखनौच्या संघाने ( Lucknow Super Giants ) लक्ष्याचा पाठलाग करताना सातपैकी पाच सामने गमावले आहेत.

राहुल म्हणाला, आम्ही काही सामने जिंकले पण लक्ष्याचा पाठलाग करण्यात तितकेसे यश मिळाले नाही. हे आपण शिकले पाहिजे. उर्वरित सत्राप्रमाणेच हे सत्रही माझ्यासाठी एक चांगला धडा होता. एक संघ म्हणून हे खूप आव्हानात्मक होते आणि आम्ही खूप काही शिकलो. हा एक मोठा सामना होता आणि मोठ्या सामन्यात तुम्ही तुमचा फॉर्म आणि शेवटच्या 14 सामन्यांमधील धावा विसरता. नवीन सामन्याप्रमाणे खेळून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करता. मी एलिमिनेटरमध्येही असेच केले, पण मला खूप काही शिकायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार असलेल्या राहुलने आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 15 सामन्यात 616 धावा केल्या आहेत.

तो म्हणाला, आम्ही चौकार-षटकार मारण्याचा प्रयत्न केला नाही, असे नाही. पण मधल्या षटकांमध्ये त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. हर्षलच्या दोन षटकांनी आमच्यावर दडपण आणले. त्यांनी दोन षटकांत केवळ आठ धावा दिल्या. खराब क्षेत्ररक्षणामुळे संघाचा मार्ग खडतर झाला. आम्ही अनेक सोपे झेल सोडले. मी दिनेश कार्तिकचा झेल सोडला, जेव्हा त्याने दुहेरी आकडा गाठला नव्हता. रजत पाटीदारला जीवदान मिळाले. असे असूनही, 208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले आणि दोन मोठ्या शॉट्सपासून चुकलो.

हेही वाचा - Ipl 2022 Till Now : षटकारांचा नवा विक्रम...आणि या मोसमात एकही झाली नाही सुपर ओव्हर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.