ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : आम्ही पहिल्या हाफमध्ये ज्या प्रकारे खेळलो, त्याबद्दल कोणतेही कारण देऊ शकत नाही - कर्णधार श्रेयस अय्यर

author img

By

Published : Apr 29, 2022, 1:10 PM IST

आयपीएल 2022 च्या 41 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर चार विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर ( Captain Shreyas Iyer ) प्रतिक्रिया देताना म्हणाला, आम्ही पहिल्या हाफमध्ये ज्या प्रकारे खेळलो त्याबद्दल कोणतेही कारण देऊ शकत नाही.

Shreyas Iyer
Shreyas Iyer

मुंंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 42 वा सामना गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals vs Kolkata Knight Riders ) संघात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्स संघावर चार विकेट्सने विजय मिळवला. हा कोलकाता संघाचा सलग पाचवा पराभव ठरला. या सामन्यात प्रथम पलंदाजी करताना कोलकाता संघाने 9 बाद 146 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 6 बाद 150 धावा करत विजय संपादन केला. यानंतर केकेआर संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रतिक्रिया ( Captain Shreyas Iyer reaction ) दिली आहे.

पराभवामुळे निराश झालेल्या श्रेयस अय्यरने सामन्यानंतर सांगितले की, "आम्ही खूप संथ सुरुवात केली आणि काही विकेट्सही गमावल्या. सुरुवातीला चेंडू थोडासा थांबून येत होता, पण तरीही मला विश्वास आहे की या विकेटवर एकूण धावसंख्या जास्त होती आणि होय, आम्ही पहिल्या हाफमध्ये ज्या प्रकारे खेळलो त्याबद्दल कोणतेही कारण देऊ शकत नाही. आम्ही कुठे चुकलो आहोत हे शोधण्यासाठी पुन्हा मागे जावे लागेल."

केकेआर आपली सलामीची जोडी वेळोवेळी बदलत आहे. याबद्दल बोलताना केकेआरचा कर्णधार म्हणाला, “गेले काही सामने खूप कठीण गेले. कारण आम्ही योग्य सलामीची जोडी सेट करू शकलो नाही. काही खेळाडू जखमी झाले आणि संघात काही बदल झाले. स्थिर फलंदाजी आणि गोलंदाजी लाइनअप असणे खूप कठीण आहे. जेव्हा तुम्ही या लीगमध्ये खेळता तेव्हा तुमच्याकडे पहिल्याच सामन्यापासून योग्य संयोजन असणे आवश्यक आहे. तुम्ही गेलात तर तिथून घेऊन जाऊ शकता.''

तो पुढे म्हणाला, 'मला वाटते की उपलब्ध पर्यायांसोबत उभे राहून निर्भय क्रिकेट खेळले पाहिजे. निर्णय घेताना आपल्याला मर्यादित विचारांच्या वर चढले पाहिजे. आमचे पाच सामने बाकी आहेत त्यामुळे आम्हाला आमच्या फ्रेंचायझीसाठी आमचे सर्व प्रयत्न करावे लागतील.'

खेळाडू कामगिरी करत नसताना बेधडक क्रिकेट कसे खेळता येईल, या प्रश्नावर उत्तर देताना अय्यर म्हणाला, 'मला वाटते की आपण त्यांना विचार करणे थांबवा असे सांगायला हवे. मागील कामगिरी विसरून जा. फक्त नवीन सुरुवात करा आणि तुमच्या हेतूंवर विश्वास ठेवा. सर्वांची तयारी चांगली आहे. ही फक्त एक मानसिकता आहे जिथे तुम्हाला बसून विचार करणे आवश्यक आहे की, मी काय करू शकतो. जास्त आत्मविश्वास बाळगा, ते ठीक आहे. तुमची चूक झाली तरी ठीक आहे.'

हेही वाचा - IPL 2022 Updates : थोडे दडपण होते, मात्र खेळपट्टीवर विश्वास ठेवला - रोवमॅन पॉवेल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.