कोलकाता: इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामाचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मंगळवारी (24मे) आयपीएल 2022 मधील पहिला सामना ( First qualifier match ) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( Rajasthan Royals vs Gujarat Titans ) यांच्यात खेळला जात आहे. ईडन गार्डन्स येथे सुरु असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने 6 बाद 188 धावा केल्या आहेत. त्याचबोरबर गुजरात टायटन्स संघाला 189 धावांचे लक्ष्य दिले आहे.
-
𝗜𝗻𝗻𝗶𝗻𝗴𝘀 𝗕𝗿𝗲𝗮𝗸!@josbuttler's 89 & Captain @IamSanjuSamson's 47 power @rajasthanroyals to 188/6. 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The @gujarat_titans chase to commence soon. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/O3T1ww9yVk#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/2JDqyDQSLX
">𝗜𝗻𝗻𝗶𝗻𝗴𝘀 𝗕𝗿𝗲𝗮𝗸!@josbuttler's 89 & Captain @IamSanjuSamson's 47 power @rajasthanroyals to 188/6. 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022
The @gujarat_titans chase to commence soon. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/O3T1ww9yVk#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/2JDqyDQSLX𝗜𝗻𝗻𝗶𝗻𝗴𝘀 𝗕𝗿𝗲𝗮𝗸!@josbuttler's 89 & Captain @IamSanjuSamson's 47 power @rajasthanroyals to 188/6. 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022
The @gujarat_titans chase to commence soon. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/O3T1ww9yVk#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/2JDqyDQSLX
जोस बटलर (89) आणि कर्णधार संजू सॅमसन ( Captain Sanju Samson ) (47) यांच्या शानदार फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सने (आरआर) इडन गार्डन्सवर खेळल्या जात असलेल्या आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्ससमोर 189धावांचे लक्ष्य ठेवले. मंगळवारी. गुजरात कडून यश दयाल, रवी श्रीनिवासन साई किशोर, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
-
.@josbuttler top scored for @rajasthanroyals in the #TATAIPL 2022 Qualifier 1 & was our top performer from the first innings. 👌 👌 #GTvRR
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A summary of his knock 🔽 pic.twitter.com/ZuN709TO3O
">.@josbuttler top scored for @rajasthanroyals in the #TATAIPL 2022 Qualifier 1 & was our top performer from the first innings. 👌 👌 #GTvRR
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022
A summary of his knock 🔽 pic.twitter.com/ZuN709TO3O.@josbuttler top scored for @rajasthanroyals in the #TATAIPL 2022 Qualifier 1 & was our top performer from the first innings. 👌 👌 #GTvRR
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022
A summary of his knock 🔽 pic.twitter.com/ZuN709TO3O
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेताना, राजस्थान रॉयल्सने पॉवरप्लेमध्ये एक विकेट गमावत 55 धावांची भर घातल्याने चांगली सुरुवात झाली. यादरम्यान सलामीवीर यशस्वी जैस्वाल (3) बाद केले. यानंतर कर्णधार संजू सॅमसनने जोस बटलरसह जोरदार फलंदाजी करत अनेक मोठे फटके मारले. पॉवरप्लेनंतर, दोन्ही फलंदाजांवर गुजरातचे फिरकीपटू राशिद खान आणि साई किशोर यांनी दबाव आणला आणि त्यांचा धावगती कमी केली. ज्यामुळे कर्णधार सॅमसन (47) धावा काढण्याच्या नादात साई किशोरच्या चेंडूवर झेलबाद झाला. यासह त्याच्या आणि बटलरमधील 47 चेंडूत 68 धावांची भागीदारी संपुष्टात आली.
10 षटकांनंतर राजस्थानने 2 गड्यांच्या मोबदल्यात 79 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर आलेल्या देवदत्त पडिक्कलने बटलरसह मधल्या षटकांमध्ये संघासाठी महत्त्वाच्या धावा केल्या. पण 15 वे षटक टाकायला आलेल्या कर्णधार हार्दिकने पडिक्कलला (28) बाद केले. त्यामुळे राजस्थानने 116 धावांवर तिसरी विकेट गमावली.
यानंतर शिमरॉन हेटमायरने बटलरला साथ दिली. त्याचवेळी बटलरने 42 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण 19व्या षटकात हेटमायर (4) शमीचा बळी ठरला. 20 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या दयालने 15 धावा दिल्या. परंतु जोस बटलर अर्धशतकानंतर ( Jose Butler half-century ) (56 चेंडूत 12 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 89 धावा) आणि रियान पराग (4) धावबाद झाले. त्यानंतर आर अश्विन 2 धावांवर नाबाद राहिला. गुजरातने 188 धावांवर राजस्थानला रोखले.