ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळू शकतो दिनेश कार्तिक - निक नाईट

author img

By

Published : Apr 13, 2022, 9:10 PM IST

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) साठी फिनिशर म्हणून भूमिका पार पाडत असलेला 36 वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik ) भारतासाठी महत्वाची भूमिकेसाठी निभावू शकतो. कारण या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकात रोहित शर्माच्या संघाचे लक्ष्य ट्रॉफी जिंकण्याचे असेल.

Dinesh Karthik
Dinesh Karthik

नवी मुंबई: इंग्लंडचा माजी कर्णधार निक नाईटने ( Nick Knight ) टिप्पणी केली आहे की, मला दिनेश कार्तिकमध्ये ( Dinesh Karthik ) एक क्रिकेटपटू दिसतो, जो यंदाच्या टी-20 विश्वचषकात फिनिशर म्हणून काम करू शकतो. जर त्याने आयपीएल 2022 मध्ये त्याच्या बेंगळुरू फ्रँचायझीसाठी सामने फिनिशर म्हणून काम सुरू ठेवले. कार्तिकने 218.33 च्या स्ट्राइक रेटने 131 धावा करत आयपीएल 2022 मध्ये आरसीबीसाठी मुख्य फिनिशर ठरला आहे. विशेषत: पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यांमध्ये त्यांने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

मंगळवारी डीवाय पाटील स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचे ( Chennai Super Kings ) आव्हान बंगळुरूने 23 धावांनी गमावले असले तरी, दिनेश कार्तिकने आव्हान पार करण्यासाठी तयार होता. कारण त्याने 217 धावांचे लक्ष्याचा पाठलाग करतााना 14 चेंडूत 242.86 च्या स्ट्राइक रेटने 34 धावां केल्या होत्या. ज्यामध्ये दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. दिनेश कार्तिकन 18व्या षटकात ड्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने चेन्नई संघाने सुटकेचा श्वास घेतला.

नाईटने क्रिकेट डॉट कॉम सांगितले की, "कार्तिक हा एक चांगला मित्र आहे. 2021 मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यात त्याने आमच्यासोबत काम केले. त्याला ओळखणारी व्यक्ती म्हणून, मी खरोखरच म्हणू शकतो की, मी त्याच्या खेळाचा आनंद घेत आहे. मला वाटतं तो 36 वर्षांचा आहे आणि तो निवृत्तीचा विचार करत नाहीये. त्याला प्रत्येक मिनिटाला खेळ आवडतो, जर तो असाच खेळत राहिला, तर कदाचित तो यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात ( T20 World Cup ) भारताकडून खेळताना दिसू शकेल.

नाइटला वाटते की, जर सीएसके संघाने थोडी कमी धावसंख्या लक्ष्य म्हणून ठेवली असती, तर अनेक खेळाडूं श्रीलंकेचा ऑफस्पिनर महेश थीक्षनाच्या ( Mahesh Theekshana ) गोलंदाजीच्या कामगिरीबद्दल बोलले नसते. या वर्षी फेब्रुवारीमध्ये आयपीएल मेगा लिलावात 70 लाख रुपयांना निवडलेल्या थीक्षनाने त्याच्या चार षटकांत 4/33 विकेट्स घेत आयपीएल 2022 ची धमाकेदार सुरुवात केली. पॉवर-प्लेमध्ये सलामीवीर फाफ डू प्लेसिस ( Faf du Plessis ) आणि अनुज रावत यांना बाद करून बंगळुरूचे 217 धावांचे लक्ष्य पार करताना त्यांनी रुळावरुन खाली उतरण्यात पाडण्यात थीक्षना महत्त्वाचा ठरला. त्यानंतर त्याने शाहबाज अहमद आणि सुयश प्रभुदेसाई यांना नंतरच्या टप्प्यात बाद करून चेन्नईला 23 धावांनी विजय मिळवून दिला.

हेही वाचा - IPL 2022 MI vs PBKS : नाणेफेक जिंकून मुंबईचा गोलंदाजीचा निर्णय; 'अशी' आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.