ETV Bharat / sports

IPL 2022 DC vs PBKS : दिल्ली कॅपिटल्स समोर आज पंजाब किंग्जचे आव्हान; मुंबईतील 'या' मैदानावर होणार सामना - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) मध्ये, बुधवारी या लीगचा 32 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

DC vs PBKS
DC vs PBKS
author img

By

Published : Apr 20, 2022, 4:27 PM IST

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 32 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज ( Delhi Capitals vs Punjab Kings ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना बुधवारी (20 एप्रिल) मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला खेळला जाणार आहे. या अगोदर हा सामना पुण्याच्या एमसीए क्रिकेट मैदानावर खेळला जाणार होता. परंतु दिल्ली कॅपिटल्स संघात कोरोनाची प्रकरणे आढळली, त्यामुळे प्रवास टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • UPDATE:
    The #DCvPBKS match scheduled for tomorrow, 20th April, has been shifted to the Brabourne Stadium, Mumbai from MCA Stadium, Pune in light of the recent COVID-19 cases in the camp.

    The entire contingent will undergo another round of RT-PCR testing on Wednesday morning. pic.twitter.com/EgZojafHLQ

    — Delhi Capitals (@DelhiCapitals) April 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिल्ली कॅपिटल्स संघाने ( Delhi Capitals Team ) आतापर्यंत आयपीएल 2022 मध्ये पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात पराभव, तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स चार गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहेत. दुसरीकडे पंजाब किंग्ज संघ ( Punjab Kings Team ) सहा सामन्यात तीन विजय आणि तीन पराभवामुळे सहा गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. मागील हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात कर्णधार मयंक अग्रवाल ( Captain Mayank Agarwal ) खेळू शकला नव्हता. त्याच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. परंतु आज होणाऱ्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता आहे. त्याच्या गैरहजेरीत संघाला पराभव स्वीकारावा लागला होता.

  • 🚨IMPORTANT UPDATE 🚨

    In light of recent developments, tomorrow’s #DCvPBKS which was scheduled to be played at the MCA Stadium, Pune will now be played at Brabourne Stadium, Mumbai. #IPL2022 pic.twitter.com/XpP3QIrXMq

    — Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिल्ली आणि पंजाबचे हेड टू हेड आकडेवारी -

1. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आतापर्यंत एकूण 28 आयपीएल सामने झाले आहेत, त्यापैकी किंग्ज इलेव्हन पंजाबने 15 सामने जिंकले आहेत आणि दिल्ली कॅपिटल्सने 13 सामने जिंकले आहेत.

2. दिल्ली कॅपिटल्सच्या सध्याच्या फलंदाजांपैकी डेव्हिड वॉर्नरने पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक 945 धावा केल्या आहेत.

3. पंजाब किंग्जच्या सध्याच्या फलंदाजांपैकी शिखर धवनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 15 सामन्यांमध्ये 522 धावा केल्या आहेत.

4. अक्षर पटेलने दिल्ली कॅपिटल्सकडून पंजाब किंग्ज विरुद्ध 4 सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत.

5.राहुल चहरने पंजाब किंग्जकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या 5 सामन्यात 5 बळी घेतले आहेत.

दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार), अश्विन हेब्बर, डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, पृथ्वी शॉ, रोवमन पॉवेल, एनरिक नोत्रेजे, चेतन साकारिया, खलील अहमद, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कमलेश नॉत्रेजी , ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विकी ओस्तवाल, यश धुल, केएस भरत आणि टिम सेफर्ट.

पंजाब किंग्ज : शिखर धवन, मयंक अग्रवाल (कर्णधार), अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, जानी बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, एम शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा , ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, हृतिक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे आणि बेनी हॉवेल.

हेही वाचा - IPL 2022 Updates : फॉर्म बिघडलेल्या विराटला रवी शास्त्रींचा महत्वाचा सल्ला, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.