मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 32 वा सामना बुधवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज ( Delhi Capitals vs Punjab Kings ) संघात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्ज संघावर 9 विकेट्सने विजय ( DC beat Punjab by 9 wickets ) मिळवला. पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 115 धावा केल्या आणि 116 धावांचे लक्ष दिले होते. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने 10.3 षटकांत 1 बाद 119 धावा करत लक्ष्य पूर्ण केले.
-
Innings Break!
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
An excellent performance with the ball from @DelhiCapitals as they bowl out #PBKS for 115. 👏 👏
The #DC chase will begin soon. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/3MYNGBm7Dg#TATAIPL | #DCvPBKS pic.twitter.com/lxMfK0aQbs
">Innings Break!
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
An excellent performance with the ball from @DelhiCapitals as they bowl out #PBKS for 115. 👏 👏
The #DC chase will begin soon. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/3MYNGBm7Dg#TATAIPL | #DCvPBKS pic.twitter.com/lxMfK0aQbsInnings Break!
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
An excellent performance with the ball from @DelhiCapitals as they bowl out #PBKS for 115. 👏 👏
The #DC chase will begin soon. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/3MYNGBm7Dg#TATAIPL | #DCvPBKS pic.twitter.com/lxMfK0aQbs
दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने 30 चेंडूत 60 धावा केल्या. पृथ्वी शॉने 20 चेंडूत 41 धावांची शानदार फलंदाजी करत संघाला सहज विजय मिळवून देण्यात यश मिळवले. त्याचबरोबर पृथ्वी शॉने आपल्या टी-20 कारकिर्दीतील 2000 धावांचा टप्पा पार केला. दिल्लीची एकमेव विकेट पृथ्वीच्या रूपाने पडली. पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नरने पहिल्या गड्यासाठी 83 धावांची भक्कम भागीदारी केली.पृथ्वी शॉला फिरकीपटू राहुल चहरने बाद केले.
-
What a way to return to winning ways! 👏 👏@DelhiCapitals put up a dominant show & sealed a clinical 9⃣-wicket win over #PBKS. 👌 👌
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard ▶️ https://t.co/3MYNGBm7Dg#TATAIPL | #DCvPBKS pic.twitter.com/6YpYU4bh18
">What a way to return to winning ways! 👏 👏@DelhiCapitals put up a dominant show & sealed a clinical 9⃣-wicket win over #PBKS. 👌 👌
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
Scorecard ▶️ https://t.co/3MYNGBm7Dg#TATAIPL | #DCvPBKS pic.twitter.com/6YpYU4bh18What a way to return to winning ways! 👏 👏@DelhiCapitals put up a dominant show & sealed a clinical 9⃣-wicket win over #PBKS. 👌 👌
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
Scorecard ▶️ https://t.co/3MYNGBm7Dg#TATAIPL | #DCvPBKS pic.twitter.com/6YpYU4bh18
तत्पूर्वी, पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना पंजाबचा संपूर्ण डाव 115 धावांत आटोपला. पंजाबकडून जितेश शर्माने सर्वाधिक 32 धावा केल्या. त्याचवेळी दिल्लीच्या गोलंदाजांनी शानदारी कामगिरी केली. कुलदीप, अक्षर, ललित आणि खलील यांनी 2-2 विकेट घेत पंजाबचा डाव 115 धावांवर रोखला.
हेही वाचा - Ipl 2022 Dc Vs Rr : दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स सामना 'या' ठिकाणी होणार