मुंबई: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स ( Chennai Super Kings vs Punjab Kings ) संघात आज आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अकरावा सामना खेळला जाणार आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबई येथे रात्री साडे सात वाजता सुरु होईल. तत्पुर्वी मयंक अग्रवाल आणि रवींद्र जडेजा यांच्यात नाणेफेक पार पडली आहे. रवींद्र जडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा ( Chennai Super Kings opt to bowl ) निर्णय घेतला आहे.
-
🚨 Toss Update 🚨@imjadeja has won the toss & @ChennaiIPL have elected to bowl against @PunjabKingsIPL.
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Follow the match ▶️ https://t.co/ZgMGLamhfU #TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/2QzODLJme2
">🚨 Toss Update 🚨@imjadeja has won the toss & @ChennaiIPL have elected to bowl against @PunjabKingsIPL.
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2022
Follow the match ▶️ https://t.co/ZgMGLamhfU #TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/2QzODLJme2🚨 Toss Update 🚨@imjadeja has won the toss & @ChennaiIPL have elected to bowl against @PunjabKingsIPL.
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2022
Follow the match ▶️ https://t.co/ZgMGLamhfU #TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/2QzODLJme2
आज खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी पंजाब संघाने दोन नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये वैभव अरोरा आणि जितेश शर्मा यांचा समावेश आहे. हे दोघे पंजाब कडून पदार्पण करत आहे. या दोघांना ओडियन स्मिथ आणि शिखर धवनने पंजाब संघाची कॅप दिली आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्स संघात एक बदल करण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्स संघात तुषार देशपांडेच्या जागी क्रिस जॉर्डनला संधी देण्यात आली आहे.
-
Congratulations to Vaibhav Arora & Jitesh Sharma who are set to make their debuts for @PunjabKingsIPL. 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Follow the match ▶️ https://t.co/ZgMGLamhfU #TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/Uk5arKXnJi
">Congratulations to Vaibhav Arora & Jitesh Sharma who are set to make their debuts for @PunjabKingsIPL. 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2022
Follow the match ▶️ https://t.co/ZgMGLamhfU #TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/Uk5arKXnJiCongratulations to Vaibhav Arora & Jitesh Sharma who are set to make their debuts for @PunjabKingsIPL. 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2022
Follow the match ▶️ https://t.co/ZgMGLamhfU #TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/Uk5arKXnJi
चेन्नई सुपर किंग्स संघाचे पारडे जड - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स ( CSK vs PBKS ) संघात आतापर्यंत आयपीएल इतिहासात 25 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 15 सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्स संघाने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यात आपसूकच चेन्नई सुपर किंग्सचे पारडे जड राहणार आहे. त्याचबरोबर दोन्ही संघाला आपापल्या मागील सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघाचा डोळा हा सामना जिंकण्यावर असणार आहे. सर्वात जास्त हा सामना जिंकण्याची गरज सीएसकेला आहे. कारण त्यांनी अजून एक ही सामना जिंकलेला नाही.
अशी आहे दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन-
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, भानुका राजपक्षे (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि वैभव अरोरा.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिटोरियस आणि मुकेश चौधरी.
हेही वाचा - IPL 2022 CSK vs PBKS: आज सुपर किंग्स समोर पंजाब किंग्सचे आव्हान; सीएसके पहिल्या विजयाच्या शोधात