मुंबई - आयपीएलच्या पुढील हंगामासाठी आणखी दोन नव्या फ्रेंचायझींना जोडले जाणार आहे. बीसीसीआयने दोन संघासाठी बेस प्राईज तब्बल 2000 करोड इतकी निश्चित केली आहे. बीसीसीआयला आशा आहे की, जेव्हा या संघासाठी बोली लागेल, ती बोली 5000 करोडपर्यंत जाईल.
पहिल्यांदा 1700 करोड रुपये बेस प्राईस निश्चित करण्यात आली होते. पण नंतर याच्यात वाढ करण्यात आली. लिलावात फ्रेंचायझींना सहभागी होण्यासाठी 75 करोड रुपयांचे दस्तऐवज खरेदी करावे लागणार आहेत. याशिवाय दस्तऐवज खरेदी करणाऱ्या कंपनीचे वर्षिक टर्नओव्हर 3000 पेक्षा जास्त असायला हवे.
बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयला बोलताना सांगितलं की, कोणतीही कंपनी लिलावाचे दस्तऐवज 75 करोड रुपये देऊन खरेदी करू शकते. पहिले वरिष्ठ आधिकाऱ्यांनी बेस प्राईज 1700 करोड रुपये ठेवण्याचा विचार केला होता. पण ती रक्कम वाढवून 2000 करोड इतकी करण्यात आली.
बीसीसीआयला आशा आहे की, या खरेदीमध्ये 5000 करोड रूपयांपर्यंत मिळतील. आयपीएलच्या पुढील हंगामात 74 सामने होणार आहेत आणि ही प्रत्येकासाठी विजयाची स्थिती आहे, असे देखील सूत्रांनी सांगितलं.
तीन बिजनेस कंपनी एकत्रित मिळून देखील बोली लावू शकतात का असे विचारले असता सूत्रांनी सांगितलं की, माझ्या मते, तीन पेक्षा जास्त बिझनेस कंपनीला कंसोर्टियम बनवण्यासाठी परवानगी नाही. पण तीन बिझनेस कंपनी संयुक्तपणे एका संघासाठी बोली लावू इच्छित असतील तर त्यांचे स्वागत आहे.
दरम्यान, आयपीएलमध्ये फ्रेचायझी मिळवण्यासाठी अनेक बिझनेस फर्म शर्यतीत आहेत. यात अदानी ग्रुप, आरपीजी संजीव गोयनका, फार्मासिटिक कंपनी टोरेंट आणि एका बँकेचा समावेश आहे. दुसरीकडे नवीन संघांसाठी अहमदाबाद, लखनऊ आणि पुणे या शहरांची नावे समोर आली आहेत.
हेही वाचा - IND VS ENG : जेम्स अँडरसनबद्दल इंग्लंड मोठा निर्णय घेण्याची शक्यता
हेही वाचा - अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीची क्रिकेटमधून निवृत्ती