चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आज रात्री सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. आरसीबीचा संघाने स्पर्धेत एक विजय मिळवला असून ते दुसऱ्या विजयाच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे सनरायजर्सचा संघ विजयाचे खाते उघडण्यासाठी प्रयत्न करत आहे. या सामन्याला सुरूवात होण्याआधी आम्ही तुम्हाला उभय संघातील हेड टू हेड आकडेवारी आणि काही स्पेशल रेकॉर्डची माहिती देणार आहोत.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हेड टू हेड रेकॉर्ड -
- सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आतापर्यंत १८ सामने झाली आहेत. यात सनरायजर्सने १० सामन्यात विजय मिळवला आहेत. तर विराटचा बंगळुरू संघ ७ सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. एक सामना काही कारणास्तव होऊ शकलेला नाही.
- सनरायजर्स हैदराबादकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सर्वाधिक धावा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने केल्या आहेत. त्याच्या नावे ५९३ धावा आहेत.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सर्वाधिक धावा विराट कोहलीने केल्या आहेत. विराटच्या नावे ५३१ धावा आहेत.
- सनरायजर्स हैदराबादकडून, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक १४ गडी बाद केले आहेत.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सनरायजर्स हैदराबादविरुद्ध फिरकीपटू युझवेंद्र चहल याने सर्वाधिक १६ गडी बाद केले आहेत.
सनरायजर्स हैदराबादचा संघ -
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), केन विल्यमसन, विराट सिंग, मनीष पांडे, प्रियम गर्ग, रिद्धीमान साहा, जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, जे. सुचीत, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, भुवनेश्वरकुमार, राशीद खान, टी. नटराजन, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बासील थम्पी, शाहबाज नदीम, मुजीब उर रहमान.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पड्डीकल, फिन अॅलेन, ए बी डिव्हिलीयर्स, पवन देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, डॅनियल सॅम्स, युजवेंद्र चहल, अॅडम झाम्पा, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, काईल जेमिसन, डॅनियल ख्रिस्तीयन, सुयश प्रभुदेसाई, के. एस. भरत.
हेही वाचा - IPL २०२१ : केकेआरचा लाजिरवाणा पराभव; शाहरूख खानने मागितली चाहत्यांची माफी
हेही वाचा - ब्रेकिंग! अक्षर पटेलनंतर दिल्ली कॅपिटल्सच्या 'या' खेळाडूला कोरोनाची लाग
ण