दुबई - श्रेयस अय्यरने दुखापतीतून सावरल्यानंतर आयपीएलमध्ये थाटात पुनरागमन केले. त्याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आकर्षक फटकेबाजी करत चाहत्याची मने जिंकली. या सामन्यातील कामगिरीसह त्याने टी-20 क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. तो टी-20 क्रिकेटमध्ये चार हजारी मनसबदार बनला आहे.
श्रेयस अय्यरने टी-20 क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा पार केला. यात आंतरराष्ट्रीय आणि सर्व टी-20 सामन्यातील धावांचा समावेश आहे. 150 टी-20 सामन्यात त्याने ही किमया साधली. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरने 25 धावा पूर्ण करताच त्याने चार हजार धावांचा टप्पा गाठला.
-
The 'Capital' comeback feat. Shreyas Iyer! 😎
— Star Sports (@StarSportsIndia) September 22, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
React to his match-winning 47* with a GIF!#DCvSRH #VIVOIPL #AsliPictureAbhiBaakiHai #YehHaiNayiDilli pic.twitter.com/5jHdwSdzqo
">The 'Capital' comeback feat. Shreyas Iyer! 😎
— Star Sports (@StarSportsIndia) September 22, 2021
React to his match-winning 47* with a GIF!#DCvSRH #VIVOIPL #AsliPictureAbhiBaakiHai #YehHaiNayiDilli pic.twitter.com/5jHdwSdzqoThe 'Capital' comeback feat. Shreyas Iyer! 😎
— Star Sports (@StarSportsIndia) September 22, 2021
React to his match-winning 47* with a GIF!#DCvSRH #VIVOIPL #AsliPictureAbhiBaakiHai #YehHaiNayiDilli pic.twitter.com/5jHdwSdzqo
हैदराबादविरुद्धच्या यासामन्याआधी त्याचे नावे 3 हजार 975 धावांची नोंद होती. यात 2 शतके आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या 147 इतकी आहे. आयपीएलमधील श्रेयसची सर्वोच्च धावसंख्या 96 इतकी आहे. त्याला अद्याप आयपीएलमध्ये शतक झळकावता आलेले नाही. पण त्याचा आयपीएलमधील स्ट्राइक रेट 126 इतका आहे.
दिल्लीचा कॅपिटल्सचा हैदराबादवर सहज विजय
आयपीएल 2021 च्या 33 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादवर 8 गडी राखत विजय मिळवला आहे. हा विजय मिळवत दिल्लीचा संघाने 14 गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. हैदराबादच्या संघाने दिल्लीच्या संघासाठी 135 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघाने 17.5 षटकांत केवळ दोन गडी गमावून 139 धावा पूर्ण केल्या. दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवनने 37 चेंडूत 42 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यर 41 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या तर कर्णधार रिषभ पंतने 21 चेंडून 3 षटकार व 2 चौकाराच्या मदतीने 35 धावांवर नाबाद राहिला.
हेही वाचा - Aus W vs Ind W : राचेल हेन्सला दुखापत, दुसऱ्या सामन्याला मुकण्याची शक्यता
हेही वाचा - IPL 2021: केकेआरसमोर आज गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे आव्हान