ETV Bharat / sports

IPl २०२१ : 'हा' संघ विजयाच्या लायकच नाही, दिग्गजाने हैदराबादला टीम सिलेक्शनवरून सुनावलं - सनरायजर्स हैदराबाद

ज्या संघात अभिषेक शर्मा, विराट सिंह आणि अब्दुल समद या अनकॅप खेळाडूंना एकाचवेळी अंतिम अकरामध्ये स्थान मिळते, तो संघ विजयाच्या लायकच नाही, असे संजय मांजरेकर यांनी म्हटलं आहे.

ipl-2021-sanjay-manjrekar-lambasted-at-hyderabad-such-selection-policy-this-team-doesnt-deserve-to-win
IPl २०२१ : 'हा' संघ विजयाच्या लायकच नाही, माजी दिग्गजाने हैदराबादच्या टीम सिलेक्शनवरून सुनावलं
author img

By

Published : Apr 18, 2021, 4:39 PM IST

चेन्नई - सनरायजर्स हैदराबाद संघाला शनिवारी मुंबई इंडियन्सकडून १३ धावांनी पराभव सहन करावा लागला. यंदाच्या हंगामातील हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव ठरला. सलग तीन पराभवानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरसह संघाच्या सिलेक्शन रणणितीवर टीका होत आहे. याविषयावरून भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हैदराबाद संघाच्या संघ निवडीवर सवाल उपस्थित केला आहे.

सनरायजर्स हैदराबाद संघाने मुंबई विरुद्धच्या सामन्यात मधल्या फळीमध्ये तीन अनुभवहिन खेळाडूंना स्थान दिले होते. या विषयावरून संजय मांजरेकर यांनी हैदराबादच्या निवड समितीवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. यात त्यांनी, ज्या संघात अभिषेक शर्मा, विराट सिंह आणि अब्दुल समद या अनकॅप खेळाडूंना एकाचवेळी अंतिम अकरामध्ये स्थान मिळते, तो संघ विजयाच्या लायकच नाही, असे म्हटलं आहे.

दरम्यान, सनरायजर्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ गडी गमावून १५० अशी धावसंख्या उभारली होती. यात क्वींटन डी कॉक (४०) रोहित शर्मा (३२) आणि केरॉन पोलार्डने नाबाद ३५ धावांचे योगदान दिले.

प्रत्युत्तरात, जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर या सलामीवीर जोडीने हैदराबादला वेगवान सुरुवात करुन दिली. बेयरस्टोने २२ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ४३ धावा फटकावल्या. तर कर्णधार डेव्हिड वॉर्नर ३५ धावा काढून धावबाद झाला.‌ यानंतर मधल्या फळीतील युवा फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले आणि परिणामी हैदराबादचा पराभव झाला.

हेही वाचा - MI VS SRH : 'हिटमॅन' रोहित म्हणतो, हैदराबादच्या 'या' दोन गोलंदाजांविरुद्ध खेळणं कठीण

हेही वाचा - 'हा' खेळाडू मुंबईकडे आहे तोपर्यंत मुंबई अजय राहील - विरेंद्र सेहवाग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.