ETV Bharat / sports

RR VS SRH : हैदराबादचा राजस्थानवर सात गड्यांनी विजय; जेसन रॉय आणि केन विल्यमसन यांची अर्धशतके - संजू सॅमसन अर्धशतकी खेळी

आयपीएल 2021 मध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला आहे. राजस्थानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 164 धावा केल्या आहेत. हैदराबादला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य मिळाले होते. हैदराबादने हे लक्ष्य सात गडी राखून पूर्ण करत सामना जिंकला.

ipl 2021 rr vs srh : Rajasthan Royals set run 165 target for Sunrisers Hyderabad
RR VS SRH : राजस्थानचे हैदराबादसमोर विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य, सॅमसनची अर्धशतकी खेळी
author img

By

Published : Sep 27, 2021, 9:15 PM IST

Updated : Sep 27, 2021, 11:29 PM IST

दुबई - संजू सॅमसनच्या तुफानी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने सनरायझर्स संघासमोर विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र जेसन रॉयचे आक्रमक अर्धशतक आणि केन विल्यमसनची संयमी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर ७ गड्यांनी मात दिली. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 164 धावा केल्या. यात सॅमसनने 82 धावांची खेळी केली.

राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा यशस्वी जैस्वाल आणि इविन लेविस ही जोडी सलामीला उतरली. यशस्वी आणि लेविस जोडीने संदीप शर्माला पहिल्या षटकात दोन चौकार मारत 11 धावा वसूल केल्या. यानंतर पुढील षटकात भुवनेश्वर कुमारने लेविसला बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला. लेविसने 4 चेंडूत 6 धावांचे योगदान दिले. त्याचा झेल अब्दुल समदने घेतला.

लेविस बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन मैदानात उतरला. संजू-यशस्वी जोडीने अर्धशतकी भागिदारी केली. तेव्हा संदीप शर्माने यशस्वी जैस्वालला क्लिन बोल्ड करत ही जोडी फोडली. यशस्वीने 23 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 36 धावांची खेळी केली. यानंतर आलेला लियाम लिविंगस्टोन फारसा कमाल दाखवू शकला नाही. त्याला राशिद खानने आपल्या फिरकी जाळ्यात अडकवले. 4 धावांवर अब्दुल समदने त्याचा झेल घेतला.

सॅमसन आणि महिपाल लोमरोर जोडीने 14व्या षटकात राजस्थानचे शतक धावफलकावर लावले. यानंतर संजू सॅमसन याने सिद्धार्थ कौलने फेकलेल्या 16 व्या षटकात 20 धावा वसूल केल्या. सॅमसन आणि लोमरोर जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी 55 चेंडूत 84 धावांची भागिदारी केली.

अखेरच्या षटकात सिद्धार्थ कौलने सॅमसनला माघारी धाडलं. सॅमसनने 57 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 82 धावांची खेळी केली. तर लोमरोर 29 धावांवर नाबाद राहिला. राजस्थानला 164 धावांपर्यंत मजल मारता आली. सिद्धार्थ कौलने 2 गडी बाद केले. तर संदीप शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.

हेही वाचा - IPL 2021 : केकेआर खरेचं कौतुकास पात्र आहे - महेंद्रसिंग धोनी

हेही वाचा - SRH VS RR : नाणेफेक जिंकून राजस्थानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

Last Updated : Sep 27, 2021, 11:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.