मुंबई - विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि संजू सॅमसनचा राजस्थान रॉयल्स संघ यांच्यात आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सामना रंगला आहे. बंगळुरूच्या संघाने विजयी हॅट्ट्रिक केली असून ते विजयी चौकार मारण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे राजस्थानचा संघ मागील सामन्यातील पराभव विसरून विजयी लय प्राप्त करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला आहे. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बंगळुरू आणि राजस्थान यांनी आपापल्या संघात एक-एक बदल केला आहे. बंगळुरूने रजत पाटीदारला बाहेर करत केन रिचर्डसन याला संधी दिली आहे. तर दुसरीकडे राजस्थान संघाने जयदेव उनाडकट याला संघाबाहेर करत श्रेयस गोपाल याला अंतिम संघात संधी दिली आहे.
बंगळुरू-राजस्थान हेड टू हेड आकडेवारी -
उभय संघात आतापर्यंत २३ सामने झाली आहेत. यात दोन्ही संघानी प्रत्येकी १०-१० सामन्यात विजय मिळवला आहे. राहिलेल्या तीन सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वॉशिग्टन सुंदर, कायले जेमिन्सन, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.
राजस्थान रॉयल्सचा संघ -
जोस बटलर, मनन वोहरा, संजू सॅमसन (कर्णधार), शिवम दुबे, डेविड वार्नर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल, चेतन सकारिया आणि मुस्ताफिजूर रहमान.
हेही वाचा - केकेआर ठरला बाजीगर : मॅच हरली पण मनं जिंकली, कमिंन्स-रसेलने तोडले अनेक रेकॉर्ड
हेही वाचा - KKR चा पराभव; शाहरुख खानच्या ट्विटने जिंकली चाहत्यांची मने