चेन्नई - रोहित शर्माने त्याच्या फिटनेटबाबतीत एक मोठी अपडेट दिली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माने त्यांच्या दुखापतीविषयी प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितलं की, किरकोळ दुखापत असून मी पुढील सामन्यापर्यंत फिट होईन.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्यानंतर रोहित शर्माने मैदान सोडलं होतं. त्यानंतर केरॉन पोलार्डने संघाची कमान सांभाळली. सामन्यानंतर डॅनी मॉरिसन यांनी रोहित शर्माला त्याच्या दुखापतीविषयी विचारलं. तेव्हा त्याने संपूर्ण खुलासा केला नाही. पण त्याने दुखापत गंभीर नसल्याचे सांगितलं.
दिल्ली कॅपिटल्सकडून झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला आणखी एक धक्का बसला. त्याला दिल्लीविरुद्धच्या सामन्यात षटकाची गती संथ राखल्याने १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दरम्यान, रोहितने ही चूक पहिल्यांदा केली त्यामुळे त्याला दंडाची शिक्षा झाली आहे. पण ही चूक रोहितकडून पुन्हा झाल्यास त्याच्यावर एक सामन्याच्या बंदीची कारवाई होऊ शकते.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने २० षटकात ९ बाद १३७ धावा केल्या. यात रोहित शर्मा (४४), सूर्यकुमार यादव (२४), इशान किशन (२६) व जयंत यादव (२३) यांनी आपले योगदान दिले. मुंबईने दिलेल्या १३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन (४५), स्टीव्ह स्मिथ (३३), ललित यावद (नाबाद २२) आणि शिमरोन हेटमायर (नाबाद १४) यांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने हा सामना १९.१ षटकांत ४ गड्याच्या मोबदल्यात जिंकला.
हेही वाचा - IPL २०२१ Points Table : मुंबईचा पराभव पण नुकसान झालं चेन्नईचं
हेही वाचा - IPL २०२१ : जस्सी भाऊ काय केलंस हे! बुमराहच्या नावे IPLच्या इतिहासातील लाजिरवाणा विक्रम