दुबई - दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रासाठी सज्ज झाला आहे. ऋषभ पंत, आर. अश्विन, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ आणि उमेश यादव यांचा शुक्रवारी क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाला. यानंतर ते संघासोबत जोडले गेले आहेत. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या सराव सत्रात जोरदार सराव केला.
दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात चांगली कामगिरी केली. ते 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी आहेत. दिल्लीने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. आणखी ते 6 सामने खेळणार आहेत. सद्या ते प्ले ऑफच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2021च्या दुसऱ्या सत्रातील आपल्या अभियाची सुरूवात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. उभय संघातील हा सामना 22 सप्टेंबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमध्ये रंगणार आहे.
श्रेयस अय्यरला पहिल्या सत्राआधी दुखापत झाली होती. यामुळे तो पहिले सत्र खेळू शकला नव्हता. आता तो दुखापतीतून सावरला असून दुसऱ्या सत्रात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजाला दुखापत
आयपीएल 2021च्या दुसऱ्या सत्राला सुरूवात होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला. दिल्लीचा फिरकीपटू गोलंदाज मनिमारन सिद्धार्थ दुखापतग्रस्त झाला असून तो आयपीएल 2021 मधून बाहेर पडला आहे. दिल्लीने सिद्धार्थच्या जागेवर नेट गोलंदाज म्हणून निवडण्यात आलेला कुलवंत खेजरोलिया याला आपल्या मुख्य संघात घेतले आहे. कुलवंत खेजरोलिया डावा हाताचा वेगवान गोलंदाज आहे.
हेही वाचा - T20 WC 2021: विराट कोहलीनंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देखील देणार राजीनामा, दिले संकेत
हेही वाचा - प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळे आणि VVS लक्ष्मण यांच्याशी BCCI संपर्क करण्याची शक्यता