मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या पर्वातील ११व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा ६ गडी राखून पराभव केला. हा सामना रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये पार पडला. सामना संपल्यानंतर कर्णधार के एल राहुलने संघाच्या पराभवाचे कारण सांगितले.
के एल राहुलचा रविवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशीच त्याला पराभवाचे तोंड पहावे लागले. सामना संपल्यानंतर राहुल म्हणाला, 'मी माझ्या वाढदिवसा दिवशी विजय मिळवू इच्छित होते. पण मी यात भाग्यशाली ठरलो नाही. आशा आहे की, आम्ही पुढील सामन्यात वापसी करू. तसे तर पाहायला गेले तर लक्षात येईल येईल की आम्ही १५ ते २० धावा कमी केल्या.'
वानखेडे स्टेडियममध्ये दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे नाही. ते ही तेव्हा जेव्हा तुम्ही एका दर्जेदार संघासमोर खेळत आहात. आम्ही नाणेफेक जिंकू शकलो नाही, यामुळे मी नक्कीच निराश आहे, असे देखील राहुल म्हणाला.
-
💔#SaddaPunjab #IPL2021 #PunjabKings #DCvPBKS pic.twitter.com/Jg4ilIZ8Fn
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 18, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">💔#SaddaPunjab #IPL2021 #PunjabKings #DCvPBKS pic.twitter.com/Jg4ilIZ8Fn
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 18, 2021💔#SaddaPunjab #IPL2021 #PunjabKings #DCvPBKS pic.twitter.com/Jg4ilIZ8Fn
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 18, 2021
दरम्यान, पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना १९५ धावा केल्या होत्या. दिल्लीने हे आव्हान १० चेंडू शिल्लक ठेवत पूर्ण केले. दिल्लीचा हा तीन सामन्यातील दुसरा विजय ठरला. तर पंजाबचा तीन सामन्यातील हा दुसरा पराभव आहे.
हेही वाचा - IPL २०२१ : पांड्या ब्रदर्सचा स्वॅग, हार्दिक अन् कृणालचा पत्नींसोबत भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - IPL २०२१ : विजयी अभियान कायम ठेवण्याचे लक्ष्य; चेन्नई-राजस्थानमध्ये आज सामना