दुबई - आयपीएल 2021 च्या प्ले ऑफ राउंडची रेस रंगतदार झाली आहे. आज स्पर्धेच्या 43वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. राजस्थानसाठी हा सामना 'करो या मरो' या स्थितीतला आहे. तर दुसरीकडे बंगळुरू हा सामना जिंकून प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी प्रयत्नशील आहे. बंगळुरूने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थानने 10 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. ते गुणतालिकेत 7व्या स्थानावर आहेत. तरीदेखील ते प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून आहेत. दुसरीकडे बंगळुरूची स्थिती चांगली असून त्यांनी 10 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. ते 12 गुणांची कमाई करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहेत.
बंगळुरूने आपल्या संघात कायले जेमिसनला विश्रांती देत जार्ज गार्टनला अंतिम संघात स्थान दिले आहे. गार्टनचा हा आयपीएलमधील डेब्यू आहे. राजस्थानच्या संघात कार्तिक त्यागीची वापसी झाली आहे. तर जयदेव उनादकट बाहेर गेला आहे.
राजस्थान-बंगळुरू हेड टू हेड आकडेवारी -
हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास दोन्ही संघ जवळपास बरोबरीत आहेत. उभय संघात आत्तापर्यंत 24 सामने झाली आहे. यातील 11 सामने बंगळुरूने जिंकली आहेत. तर राजस्थानचा संघ 10 सामन्यात विजयी ठरला आहे. राहिलेल्या तीन सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही. मागील 3 सामन्याबाबत सांगायचे झाल्यास बंगळुरूने तिन्ही सामन्यात राजस्थानचा पराभव केला आहे.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेईंग इलेव्हन -
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत, ग्लेन मॅक्सवेल, ए बी डिव्हिलियर्स, डॅनियल ख्रिश्चियन, जॉर्ज गार्टन, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल.
- राजस्थान रॉयल्स प्लेईंग इलेव्हन -
एविन लुईस, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, महिपाल लोमरोर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, कार्तिक त्यागी, चेतन सकारिया आणि मुस्तफिजूर रहमान.
हेही वाचा - फिरकीपटू कुलदीप यादववर यशस्वी शस्त्रक्रिया; सांगितलं कशावर करणार आता फोकस
हेही वाचा - लग्नासाठी कशी मुलगी हवी? नीरज चोप्राने लाजून दिलं उत्तर