मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या पर्वामध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सामना रंगला आहे. कोलकाता आणि राजस्थान यांनी या हंगामात प्रत्येकी ४-४ सामने खेळली आहेत. यात दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ विजय मिळवला आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थानने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. त्यांनी मनन वोहराच्या जागेवर मुंबईकर यशस्वी जैस्वालला संधी दिली आहे. तर श्रेयश गोपाल ऐवजी जयदेव उनाडकटला अंतिम संघात स्थान मिळालं आहे. कोलकाताने कमलेश नागरकोटीच्या जागेवर शिवम मावीला संधी दिली आहे.
कोलकाता-राजस्थान हेड टू हेड आकडेवारी -
उभय संघात आतापर्यंत २३ सामने झाली आहे. यातील १२ सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आहे. तर राजस्थान संघाने १० सामन्यात विजय साकारला आहे. रहिलेल्या एका सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही.
- राजस्थान रॉयल्सचा संघ -
- संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, चेतन साकरिया, जयदेव उनादकट आणि मुस्तफिजूर रहमान.
- कोलकाता नाईट रायडर्सचा संघ -
- इयॉन मॉर्गन (कर्णधार), नितीश राणा, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, सुनील नारायण, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरूण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा.
हेही वाचा - B'day Special: 'ईटीव्ही भारत'चा सचिनच्या वाढदिवसानिमित्त खास आढावा
हेही वाचा - मी प्लाझ्मा देणार, तुम्हीही दान करा; सचिनचे वाढदिवसानिमित्त आवाहन