अहमदाबाद - आयपीएल २०२१ मध्ये डबल हेडरमधील दुसरा सामना काल पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला. या सामन्यात दिल्लीने ७ गडी राखून पंजाबवर विजय मिळवला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीपुढे विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले. कर्णधार मयांक अग्रवालने एकांकी झुंज देत नाबाद ९९ धावांची खेळी केली होती. दिल्लीने १७ ओवर आणि ४ चेंडूत ७ गडी राखून १६७ धावांचे लक्ष गाठले.
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाबला प्रभसिमरमच्या रुपाने पहिला धक्का बसला. प्रभसिमरनने १६ चेंडूत १२ धावा केल्या. त्याला कगिसो रबाडाने स्टिव्ह स्मिथकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर रबाडाने धोकादायक ख्रिस गेलला क्लिन बोल्ड केलं. तेव्हा मयांक आणि मलान जोडीने पंजाबची धावसंख्या शतकासमीप नेली. अक्षर पटेलने मलानला क्लिन बोल्ड करत पंजाबला चौथा धक्का दिला. मलानने २६ धावा केल्या.
दीपक हुडा (१) धावबाद झाला. एका बाजूने विकेट जात असताना दुसरी बाजू लावून धरत मयांकने धावगती वाढली. त्याने शाहरूखला साथीला घेत संघाला शतकी टप्पा पार करून दिला. यादरम्यान, मयांकने आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेरच्या हाणामारीच्या षटकात (४) शाहरूख आवेश खानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल हेटमायरने घेतला. मयांकने ५८ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ९९ धावा केल्या. अखेरीस पंजाबच्या संघाला २० षटकात ६ बाद १६६ धावापर्यंत मजल मारता आली. दिल्लीकडून रबाडाने २ तर अक्षर पटेल आणि खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा - IPL २०२१ : केएल राहुल रुग्णालयामध्ये भरती, करावी लागणार शस्त्रक्रिया
हेही वाचा - RR vs SRH : राजस्थानचा हैदराबादवर ५५ धावांनी विजय