अहमदाबाद - आयपीएल २०२१ मध्ये आज डबल हेडरमधील दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाबने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. कर्णधार केएल राहुल पोटात दुखत असल्याने तो रुग्णालयात भरती आहे. यामुळे तो हा सामना खेळणार नाही. त्याच्या जागेवर मयांक अग्रवाल संघाचे नेतृत्व करत आहे. निकोलस पूरमच्या जागेवर डेव्हिड मलानला संधी मिळाली आहे. दुसरीकडे दिल्लीने आपला संघ कायम ठेवला आहे.
दिल्ली विरुद्ध पंजाब हेड टू हेड आकडेवारी -
उभय संघात आतापर्यंत २७ सामने झाली आहे. यातील १५ सामने पंजाबने जिंकली आहेत. तर १२ वेळा दिल्ली संघाने विजय मिळवला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
पृथ्वी शॉ, शिखर धन, स्टिव्ह स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, ललित यादव, कगिसो रबाडा, इशांत शर्मा आणि आवेश खान.
पंजाब किंग्जचा संघ -
मयांक अग्रवाल (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, ख्रिस गेल, डेव्हिड मलान, दीपक हुड्डा, शाहरुख खान, हरप्रीत बराड़, ख्रिस जॉर्डन, रिले मेरेडिथ, रवि बिश्नोई आणि मोहम्मद शमी.
हेही वाचा - IPL २०२१ : CSK विरुद्धच्या सामन्यात MI ने चिटिंग केली; हे मुंबईचे स्पिरीट का?
हेही वाचा - RR vs SRH : बटलरचे वादळी शतक, राजस्थानचे हैदराबादपुढे २२१ धावांचे आव्हान