ETV Bharat / sports

भारतातील बायो बबल वातावरण आतापर्यंतचे सर्वाधिक असुरक्षित - झम्पा - अॅडम झम्पा आयपीएल २०२१

आम्ही आतापर्यंत अनेक ठिकाणी बायो बबल वातावरणात खेळलो आणि मला वाटतं की, भारतातील बायो बबलचे वातावरण हे सुरक्षित नाही. आम्हाला भारतात नेहमीच स्वच्छतेबद्दल सांगितलं जात होते आणि अधिकची दक्षता घ्यावी लागत होती, असे अॅडम झम्पाने म्हटलं आहे.

ipl-2021-probably-most-vulnerable-bio-bubble-adam-zampa
भारतातील बायो बबल वातावरण आतापर्यंतचे सर्वाधिक असुरक्षित - झम्पा
author img

By

Published : Apr 28, 2021, 8:00 PM IST

मुंबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील खेळाडू अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी वैयक्तिक कारण देत आयपीएलमधून माघार घेऊन ऑस्ट्रेलिया गाठलं आहे. मायदेशी परतल्यानंतर झम्पा यानं, आयपीएलच्या बायो बबल विषयी मोठं विधान केलं आहे.

अ‍ॅडम झम्पाने एका माध्यमाला मुलाखत दिली. यात तो म्हणाला, 'आम्ही आतापर्यंत अनेक ठिकाणी बायो बबल वातावरणात खेळलो आणि मला वाटतं की, भारतातील बायो बबलचे वातावरण हे सुरक्षित नाही. आम्हाला भारतात नेहमीच स्वच्छतेबद्दल सांगितलं जात होते आणि अधिकची दक्षता घ्यावी लागत होती.'

सहा महिन्यांपूर्वीच आयपीएल स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात आली होती. पण तिथे आम्हाला अजिबात असुरक्षित असे वाटलं नाही. मला तिथे खूप सुरक्षित वाटले. वैयक्तिकरित्या मला वाटते की, आयपीएलसाठी यूएई हा एक चांगला पर्याय ठरला असता, परंतु त्यात बरीच राजकारणाची जोड आहे. यावर्षी टी-२० विश्वकरंडक भारतात होणार आहे. कदाचित क्रिकेट विश्वात पुढील चर्चा यावर असेल, असे देखील झम्पा म्हणाला.

बंगळुरूचा पाचवा विजय -

आयपीएल २०२१ मध्ये २२ वा सामना रंगतदार झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर एका धावेने विजय साकारला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूने एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीला १७२ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या ऋषभ पंत आणि शिमरोन हेटमायरने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्यांना अपयश आले. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १४ धावांची गरज असताना मोहम्मद सिराजने १२ धावा देत बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बंगळुरूचा या स्पर्धेतील हा पाचवा विजय आहे.

हेही वाचा - धोनीच्या आई वडिलांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज

हेही वाचा - IPL २०२१ : मोहम्मद सिराज नवा यॉर्कर 'किंग', पाहा जबराट व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.