मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दमदार सुरूवात केली आहे. बंगळुरूने आपले दोन्ही सामने जिंकत गुणतालिकेत अव्वलस्थान मिळवले आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबईचा २ गडी राखून पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात सनरायजर्सवर ६ धावांनी विजय मिळवला.
बुधवारी झालेल्या बंगळुरू विरुद्ध हैदराबाद सामन्यानंतर गुणतालिकेत काही बदल पाहायला मिळाले. हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि बंगळुरू या संघांनी प्रत्येकी २-२ सामने खेळली आहेत. यात बंगळुरू संघाने दोन्ही सामने जिंकली आहेत. तर राहिलेली इतर संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.
गुणतालिकेत विराटचा बंगळुरू संघ ४ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर दिल्लीचा संघ एक सामन्यानंतर दोन गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानी मुंबईचा संघ आहे. पंजाबने एक सामन्यात विजय मिळवत चौथे स्थान काबीज केले आहे. पाचव्या स्थानी कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आहे.
दिल्ली, मुंबई, पंजाब आणि कोलकाता यांचे प्रत्येकी २-२ गुण आहे. परंतु, नेट रनरेटनुसार ते अनुक्रमे, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमाकांवर आहेत. सहाव्या स्थानी राजस्थान आणि सातव्या स्थानी हैदराबादचा संघ आहे. चेन्नईचा संघ या यादीत तळाशी म्हणजे आठव्या स्थानी आहे.
हेही वाचा - IPL २०२१ : दोन युवा कर्णधारामध्ये आज लढत; दिल्ली-राजस्थान आमने-सामने
हेही वाचा - IPL २०२१ : बाद झाल्यानंतर संतापलेल्या विराटने बॅटने उडवली खुर्ची, झाली शिक्षा