मुंबई - विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मंगळवारी झालेल्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर अखेरच्या चेंडूवर फक्त एका धावेने विजय मिळवला. या विजयासह बंगळुरू संघाने गुणतालिकेत महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला धक्का दिला.
दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी बंगळुरूचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी होता. चेन्नई संघ पहिल्या स्थानावर विराजमान होता. बंगळुरूने दिल्लीवर विजय मिळवत पहिले स्थान काबीज केले. बंगळुरूचा या हंगामातील हा पाचवा विजय होता. आतापर्यंतच्या सहा सामन्यांमध्ये त्यांनी पाच विजय मिळवले असून त्यांच्या खात्यात १० गुण जमा झाले आहेत.
चेन्नईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून दिल्लीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघाचे समान ८ गुण आहेत. पण धावगतीच्या जोरावर ते विविध क्रमाकांवर आहेत. चौथ्या स्थानावर मुंबईचा संघ ४ गुणांसह कायम आहे. मुंबईने ५ सामने खेळली असून यात दोन विजय मिळवले आहेत. कोलकाता, पंजाब आणि राजस्थानचा संघ अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानी आहे. हैदराबादचा संघ तळाशी म्हणजे आठव्या स्थानी आहे.
हेही वाचा - RCB Vs DC : बंगळुरूचा दिल्लीवर एका धावेने विजय
हेही वाचा - धोनीच्या आई वडिलांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज