नवी दिल्ली - आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील २४वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईने आपल्या संघात एक बदल केला आहे. त्यांनी इशान किशनला बाहेर करत त्याच्या जागेवर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू नॅथन कुल्टर नाइलला अंतिम संघात स्थान दिलं आहे. दुसरीकडे राजस्थानने आपला संघ कायम ठेवला आहे.
मुंबई वि. राजस्थान हेड टू हेड आकडेवारी -
उभय संघात आतापर्यंत २३ सामने झाली आहेत. यातील ११ सामन्यात मुंबईने बाजी मारली आहे. दुसरीकडे राजस्थानने देखील ११ सामने जिंकली आहेत. एक सामन्याचा निकाल लागलेला नाही.
मुंबई इंडियन्सचा संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, केरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, राहुल चाहर, नाथन कुल्टर नाइल आणि ट्रेंट बोल्ट.
राजस्थान रॉयल्सचा संघ -
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रियान पराग, ख्रिस मॉरिस, चेतन सकारिया आणि मुस्ताफिजुर रहमान.
हेही वाचा - भारतातील बायो बबल वातावरण आतापर्यंतचे सर्वाधिक असुरक्षित - झम्पा
हेही वाचा - IPL २०२१ : मोहम्मद सिराज नवा यॉर्कर 'किंग', पाहा जबराट व्हिडिओ