मुंबई - आयपीएलच्या चौदावा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्यानंतर परदेशी खेळाडूंची घरवापसी सुरू झाली आहे. पण ऑस्ट्रेलियासह काही देशांनी भारतातून येणाऱ्या विमानसेवा रोखली आहे. त्यामुळे घरी कसे जायचे हा प्रश्न खेळाडूंना सतावत आहे. अशात मुंबई इंडियन्स त्यांच्या संघातील परदेशी खेळाडूंना स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईट्सने पाठवणार असल्याचे सांगितलं आहे. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सने अन्य फ्रँचायझींनाही मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे.
मुंबई इंडियन्स त्यांच्या परदेशी खेळाडूंना ज्या चार्टर्ड फ्लाईट्समध्ये मायदेशी पाठवणार ते चार्टर्ड फ्लाईट्स न्यूझीलंड, वेस्ट इंडिज मार्गे दक्षिण आफ्रिकेला जाणार आहेत. त्यांनी अन्य फ्रँचायझींनाही त्यांच्या परदेशी खेळाडूंना सोबत पाठवण्यास सांगितले आहे.
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, जेम्स नीशम, शेन बाँड ही न्यूझीलंडच्या खेळाडू आहेत. एक चार्टर्ड फ्लाईट केरॉन पोलार्डला घेऊन त्रिनिदादकडे रवाना होणार आहे. त्याच विमानातून आफ्रिकेचे खेळाडू क्विंटन डी कॉक व मार्को जॅन्सेन हे देखील जाणार आहेत. येत्या २४ ते ४८ तासांत ही विमाने खेळाडूंना घेऊन त्या त्या ठिकाणी रवाना होणार आहेत. पण अद्याप ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची मायदेशी परतण्याची व्यवस्था कशी करण्यात आली आहे. याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
हेही वाचा - क्रिकेटर वेदा कृष्णमूर्तीबरोबर नियतीचा क्रूर खेळ; आईनंतर बहिणीचा कोरोनाने मृत्यू
हेही वाचा - छत्रसाल स्टेडिअममध्ये झालेल्या खूनाप्रकरणी कुस्तीपटू सुशील कुमार दिल्ली पोलिसांच्या रडावर