ETV Bharat / sports

धोनीच्या आई वडिलांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज

author img

By

Published : Apr 28, 2021, 3:20 PM IST

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या आई आणि वडिलांनी कोरोनावर मात केली आहे.

IPL 2021 : ms-dhoni-mother-and-father-got-discharged-from hospital ranchi
धोनीच्या आई वडिलांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई - भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या आई आणि वडिलांनी कोरोनावर मात केली आहे. दोघांनाही मंगळवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनाने याची दिली. दोघेही रांची येथील त्यांच्या राहत्या घरी आराम करत आहेत.

धोनीचे वडील पान सिंग आणि आई देवकी यांना २१ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दोघांनाही रांची येथील पल्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोघांनाही सौम्य लक्षणे होती. त्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले होते. सोमवारी दोघांनी कोरोनावर मात केली आणि मंगळवारी दोघांचीही कोरोना चाचणी निगेटीव्ह आली. तेव्हा त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

दरम्यान, देशासह झारखंड राज्यामध्ये देखील कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये ३ लाख ६० हजार ९६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर झारखंडमध्ये ६ हजार २० नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार २९३ रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

हेही वाचा - जिंकलस भावा! ब्रेट ली याने भारताला ऑक्सिजन खरेदीसाठी दिली ४२ लाखांची मदत

हेही वाचा - निर्धास्त व्हा, तुम्हाला सुरक्षित घरी पोहोचवेपर्यंत आमच्यासाठी स्पर्धा संपलेली नाही - बीसीसीआय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.