ETV Bharat / sports

MI Vs RCB : नाणेफेक जिंकून मुंबईचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

author img

By

Published : Sep 26, 2021, 7:03 PM IST

Updated : Sep 26, 2021, 7:17 PM IST

आयपीएल 2021 मध्ये आज डबल हेडरमधील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ipl 2021 mi vs rcb :  Mumbai Indians won the toss and opt to bowl
MI Vs RCB : नाणेफेक जिंकून मुंबईचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

दुबई - आयपीएल 2021 मध्ये आज डबल हेडरमधील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरसीबी 9 सामन्यात 10 गुणांची कमाई करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबईने 9 पैकी 4 सामन्यात विजय मिळवले आहेत. राहिलेल्या 5 सामन्यात त्यांना पराभवांचे तोंड पहावे लागले आहे. ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत.

आरसीबीविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईने संघात एक बदल केला आहे. सौरव तिवारीच्या जागेवर हार्दिक पांड्याची संघात वापसी झाली आहे. दुसरीकडे आरसीबीने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. नवदीप सैनी, वनिंदु हसरंगा आणि टिम डेविडच्या जागेवर डॅन ख्रिस्टियन, शाहबाज अहमद आणि कायले जेमिसन यांना संघात स्थान दिलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -

विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, के एस भरत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाज अहमद, डेनियल ख्रिस्टीयन, कायले जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल.

मुंबई इंडियन्सचा संघ -

रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, केरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, ट्रेंट बोल्ट, एडम मिल्ने, जसप्रीत बुमराह आणि राहुल चाहर.

Last Updated : Sep 26, 2021, 7:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.