मुंबई - पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार के एल राहुलला रविवारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पंजाब किंग्जने सोशल मीडियावरून याची महिती दिली.
पंजाब किंग्ज संघाने या संदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी, काल रात्री राहुलच्या पोटात दुखू लागले. तेव्हा त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तरीदेखील त्याला बरे न वाटू लागल्याने पुढील चाचणीसाठी त्याला रुग्णालयामध्ये नेण्यात आले. तेथे त्याला अपेंडिसिटिसचा त्रास असल्याचे समोर आले आहे. शस्त्रक्रिया करून तो बरा होऊ शकतो. त्याच्या सुरक्षिततेसाठी त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, पंजाब किंग्जचा आज दिल्ली कॅपिटल्सशी सामना होणार आहे. या सामन्याआधी राहुल बाहेर गेल्याने पंजाबला मोठा धक्का बसला आहे. राहुलच्या अनुपस्थितीत आजच्या सामन्यात ख्रिस गेल संघाचे नेतृत्व सांभाळू शकतो.
हेही वाचा - IPL २०२१ : CSK विरुद्धच्या सामन्यात MI ने चिटिंग केली; हे मुंबईचे स्पिरीट का?
हेही वाचा - RR vs SRH : बटलरचे वादळी शतक, राजस्थानचे हैदराबादपुढे २२१ धावांचे आव्हान