ETV Bharat / sports

KKR VS CSK : चुरशीच्या सामन्यात चेन्नईचा केकेआरवर विजय

अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने कोलकाता नाइट रायडर्स संघाचा 2 गडी राखून पराभव केला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना चेन्नई समोर विजयासाठी 172 धावांचे आव्हान ठेवले होते. चेन्नईने अखेरच्या चेंडूवर विजयी धाव घेत सामना आपल्या नावे केला.

ipl 2021 KKR vs csk : Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 2 wickets
KKR VS CSK : चुरशीच्या सामन्यात चेन्नईचा केकेआरवर विजय
author img

By

Published : Sep 26, 2021, 7:28 PM IST

Updated : Sep 26, 2021, 7:55 PM IST

अबुधाबी - अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाइट रायडर्सचा 2 गडी राखून पराभव केला. सामन्याच्या 19 व्या षटकात रविंद्र जडेजाने विस्फोटक फलंदाजीचा नजराणा पेश करत सामना चेन्नईच्या बाजूने फिरवला. चेन्नईला अखेरच्या 12 चेंडूत विजयासाठी 26 धावांची गरज होती. तेव्हा जडेजाने प्रसिद्ध कृष्णाने फेकलेल्या 19व्या षटकात 22 धावा कुटल्या. यात 2 षटकार आणि 2 चौकाराचा समावेश आहे. पण अखेरच्या षटकात सुनिल नरेनने सॅम कुरेन आणि रविंद्र जडेजाला बाद करत सामन्यात रंगत आणली. परंतु अखेरच्या चेंडूवर दीपक चहरने विजयी धाव घेतली. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 171 धावा केल्या होत्या. केकेआरचे हे आव्हान चेन्नईने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले.

केकेआरने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई संघाला ऋुतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी चांगली सलामी दिली. दोघांनी 6 षटकात बिनबाद 52 धावा धावफलकावर लावल्या. चेन्नईचा पहिला गडी 76 धावांवर बाद झाला. ऋुतुराज गायकवाड 28 चेंडूत 40 धावा काढून बाद झाला. त्याला आंद्रे रसेलने इयॉन मॉर्गनकडे झेल देण्यास भाग पाडले.

ऋुतुराज गायकवाडनंतर फाफ डू प्लेसिस माघारी परतला. त्याला प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. डू प्लेसिसने 30 चेंडूत 43 धावांची खेळी केली. यानंतर अंबाटी रायुडू वैयक्तिक 10 धावा काढून बाद झाला. त्याला सुनिल नरेन याने क्लिन बोल्ड केले. रायुडूनंतर आलेल्या मोईन अलीने स्फोटक फलंदाजी केली. त्याला लॉकी फर्ग्यूसन याने बाद केले. त्याने 28 चेडूत 32 धावांची खेळी केली.

चेन्नईला सुरेश रैनाच्या रुपाने पाचवा धक्का बसला. वरुण चक्रवर्तीने त्याला धावबाद केले. त्याने 11 धावांचे योगदान दिले. यानंतर आलेल्या महेंद्र सिंग धोनीची (1) शिकार देखील चक्रवर्ती यानेच केली. धोनीला त्याने क्लिन बोल्ड केले.

धोनी बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजाने डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने अखेरच्या 12 चेंडूत 26 धावांची गरज असताना प्रसिद्ध कृष्णाच्या षटकात दोन षटकार आणि दोन चौकारासह 22 धावा वसूल केल्या आणि सामना चेन्नईच्या बाजूने फिरवला.

पण सुनिल नरेनने अखेरच्या षटकात सॅम कुरेन (4) आणि जडेजाला (8 चेंडूत 22) बाद करत सामन्यात रंगत आणली. चेन्नईला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी एक धावेचे गरज होती. दीपक चहरने एक धाव घेत चेन्नईला विजय मिळवून दिला. केकेआरकडून सुनिल नरेनने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर प्रसिद्ध कृष्णा, लॉकी फर्ग्यूसन, वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.

हेही वाचा - IPL 2021 : पंजाब किंग्सने केवळ पाच धावांनी केला सनरायझर्स हैदराबादचा पराभव

हेही वाचा - MI Vs RCB : नाणेफेक जिंकून मुंबईचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

Last Updated : Sep 26, 2021, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.