मुंबई - राजस्थान रॉयल्सचा दिग्गज सलामीवीर जोस बटलरने त्याचा युवा सलामीवीर जोडीदार यशस्वी जैस्वाल याला एक खास गिफ्ट दिलं आहे. त्याने जैस्वालला ऑटोग्राफ केलेली बॅट गिफ्ट केली आहे. दरम्यान, आयपीएल २०२१ स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली आहे. आता सर्व खेळाडू घरी परतत आहेत.
राजस्थान रॉयल्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो यशस्वी जैस्वाल आणि त्याचा सलामीवीर जोडीदार जोस बटलर यांचा आहे. यात बटलर जैस्वालला त्याची बॅट ज्यावर त्याने ऑटोग्राफ केली आहे. ती भेट दिली आहे. राजस्थान रॉयल्सने या फोटोला 'खास सलामीवीर जोडीदारकडून भेट' असे कॅप्शन दिले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जैस्वालला भेट दिलेल्या बॅटवर बटलरने खास मॅसेज देखील दिला आहे. 'तुझ्यातील प्रतिभेचा फायदा घे. माझ्या शुभेच्छा सोबत आहेत,' या शब्दात बटलरने त्याच्या संघामधील खेळाडूचा उत्साह वाढवला आहे.
दरम्यान, मुंबईकर यशस्वी जैस्वाल २०२० मध्ये झालेल्या अंडर-१९ विश्व करंडकामुळे प्रसिद्धीस आला. त्याला मागील हंगामात राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात घेतलं आहे. जैस्वालला या हंगामामध्ये सुरुवातीला संधी मिळाली नाही. पहिल्या चार सामन्यानंतर त्याला संधी मिळाली. त्याने ३ डावामध्ये १३२ च्या स्ट्राईक रेटने ६६ धावा केल्या. ३२ ही त्याची या हंगामातील सर्वोच्च आहे.
हेही वाचा - IPL तात्काळ का स्थगित करण्यात आलं?, गव्हर्निंग काउंसिलचे स्पष्टीकरण
हेही वाचा - IPLच्या स्थगितीनंतर आता टी-२० विश्व करंडकावरही संकट; भारताऐवजी 'या' देशात स्पर्धा होण्याची शक्यता