मुंबई - कोलकाता नाईट रायडर्सचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलला आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आपली छाप सोडता आलेली नाही. तो धावा करताना झगडताना दिसत आहे. या विषयावरून गिलवर टीका होत आहे. पण केकेआर संघाचा मेंटर डेव्हिड हसीने मात्र गिलीच पाठराखण केली आहे.
राजस्थान विरुद्धच्या सामन्यात शुबमन गिल पुन्हा एकदा अपयशी ठरला. या सामन्यात तो केवळ ११ धावा करू शकला. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना हसी म्हणाला, 'शुबमन हा स्टार खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियात त्याने चांगली कामगिरी केली होती. नेट्समध्ये देखील तो सातत्याने सराव करत असतो. तो खास खेळाडू आहे. खेळाडू फॉर्ममध्ये असो किंवा नसो त्याचा दर्जा कायम असतो. त्याच्यामध्ये नैसर्गिक प्रतिभा आहे. तुम्ही लिहून घ्या, माझ्या मते स्पर्धा संपेपर्यंत शुबमन स्पर्धेतील सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंमध्ये समाविष्ट असेल.'
दरम्यान, शुबमन गिलला आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील ५ सामन्यांमध्ये केवळ ८० धावा करता आल्या आहेत. तसेच केकेआर संघाची देखील कामगिरी निराशाजनक आहे. केकेआरला पाचपैकी चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते गुणतालिकेत तळाशी म्हणजे आठव्या क्रमाकांवर आहेत. त्यांचा पुढील सामना उद्या (२६ एप्रिल) पंजाब किंग्ज संघासोबत होणार आहे.
हेही वाचा - कौतूकास्पद! १९ वर्षीय गोल्फपटूने आपली कमाई दिली कोविड लसीकरण मोहिमेला
हेही वाचा - CSK VS RCB : चेन्नईचे बंगळुरूसमोर १९२ धावांचे आव्हान, जडेजाची वादळी खेळी