ETV Bharat / sports

कोरोनावर मात करून बंगळुरू संघात सामिल झाला 'हा' स्टार खेळाडू - डॅनियल सॅम्सची कोरोनावर मात

बंगळुरूचा अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्सने कोरोनावर मात केली आहे. तो संघासोबत जोडला गेला आहे. याची माहिती बंगळुरू संघाच्या व्यवस्थानाने एक निवेदन जारी करत दिली.

IPL 2021 : Daniel Sams Joins RCB Bio-Bubble After Testing Negative For Coronavirus
कोरोनावर मात करत बंगळुरू संघात सामिल झाला 'हा' स्टार खेळाडू
author img

By

Published : Apr 17, 2021, 6:25 PM IST

मुंबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. बंगळुरूचा अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्सने कोरोनावर मात केली आहे. तो संघासोबत जोडला गेला आहे. याची माहिती बंगळुरू संघाच्या व्यवस्थानाने एक निवेदन जारी करत दिली.

  • Daniel Sams is out of quarantine and has joined the RCB bio-bubble today with two consecutive negative reports for COVID-19.

    RCB medical team was in constant touch with Sams and has declared him fit to join the team after adhering to all the BCCI protocols.#PlayBold #IPL2021 pic.twitter.com/0none9RQ7l

    — Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आयपीएल सुरू होण्याच्या दोन दिवस आधी म्हणजे ७ एप्रिलला डॅनियल सॅम्सला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याला क्वारंटाईन करण्यात आले आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याने कोरोनावर मात केली आहे. तो संघाच्या बायो बबलममध्ये सामील झाला आहे.

दरम्यान, डॅनियल सॅम्स हा बंगळुरूचा दुसरा खेळाडू आहे, ज्याला कोरोनाची लागण झाली होती. याआधी बंगळुरूचा स्टार सलामीवीर देवदत्त पडीकक्कल यालाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आढळल्यानंतर तो देखील संघात सामील झाला.

बंगळुरूने आयपीएल २०२१ मध्ये आतापर्यंत दोन सामने खेळली आहेत. या दोनही सामन्यात त्यांनी विजय मिळवत गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे. त्याचा पुढील सामना रविवारी चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सबरोबर होणार आहे.

हेही वाचा - 'जा गोलंदाजीसाठी परत जा', धोनीने चहरला डीआरएस न घेऊ देता गोलंदाजीसाठी पाठवलं

हेही वाचा - IPL २०२१ : महेंद्रसिंह धोनीने दिला शाहरूखला कानमंत्र, फोटो व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.