अबुधाबी - ऋतुराज गायकवाड व फाफ डूप्लेसिस या दोघांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे बंगळुरूच्या विराट कोहली (53) व देवदत्त पडीकल (70) या दोघांची 111 धावांची भागीदारी विफल ठरली. सीएसकेने आरसीबीवर सहा गडी राखत विजय मिळवला आहे. यासोबतच चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
नाणेफेक जिंकलेल्या महेंद्रसिंह धोनीने विराटसेनेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. विराट कोहली व देवदत्त पडीकल या दोघांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 111 धावांची भागीदारी केली. धडाकेबाज सुरुवात केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने शेवटच्या पाच षटकात विकेट्स गमावत चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले. विराट कोहली व देवदत्त यांच्या स्फोटक फलंदाजी केली. दोघे बाद झाल्यानंतर आलेल्या आरसीबीच्या फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. पहिल्या 10 षटकांत 90 धावा करणारा आरबीचा संघ शेवटच्या पाच षटकात त्यांना केवळ २५ धावा काढत 156 धावांवर गारद झाला.
प्रत्युत्तरात चेन्नईच्या संघातील ऋतुराज गायकवाड (38) व फाफ डूप्लेसिस (31) या सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी केली. मोइन अली याने 23 तर अंबाती रायडू याने 32 धावा ठोकत संघाचे धावफलक मजबूत केले. त्यानंतर सुरेश रैना (17) व कर्णधार महेंद्रसिंह धोनी (11) धावांवर नाबाद राहत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याचबरोबर 14 गुणांसह चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
हेही वाचा - आयसीसीने T20 विश्वकरंड स्पर्धेसाठी लाँच केलं थीम साँग