ETV Bharat / sports

CSK VS RCB : जडेजाने बंगळुरूचा पद्धतशीर कार्यक्रम केला, चेन्नईचा ६९ धावांनी विजय - chennai vs bangalore match results

चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा धावांनी ६९ धुव्वा उडवत गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले.

ipl 2021 :  csk set a target of 192 runs to win for rcb
CSK VS RCB : जडेजाने बंगळुरूचा पद्धतशीर कार्यक्रम केला, चेन्नईचा ६९ धावांनी विजय
author img

By

Published : Apr 25, 2021, 5:33 PM IST

Updated : Apr 25, 2021, 7:18 PM IST

मुंबई - चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६९ धावांनी धुव्वा उडवत गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ २० षटकात ९ बाद १२२ धावा करू शकला. रविंद्र जडेजाने ४ षटकात १३ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. फलंदाजीत जडेजाने २८ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६२ धावांची खेळी केली.

चेन्नईने विजयासाठी दिलेल्या १९२ धावांचा पाठलाग करणाऱ्या बंगळुरू संघाची सुरूवात चांगली झाली. विराट-पडीक्कल जोडीने ३.१ षटकात ४४ धावा फलकावर लावल्या. तेव्हा सॅम कुरेनने बंगळुरूला पहिला धक्का दिला. त्याने विराट कोहलीला ८ धावांवर धोनीकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर पडीक्कल ठाकूरचा शिकार ठरला. त्याने १५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३४ धावा केल्या.

रविंद्र जडेजाने सुंदर (७), ग्लेन मॅक्सवेल (२२) आणि डिव्हिलियर्स (४) यांना बाद करत बंगळुरूची झुंज मोडून काढली. डॅनियल ख्रिश्चियन जडेजाच्या थेट फेकीवर धावबाद झाला. अखेरीस बंगळुरूचा संघ कसाबसा १२२ धावापर्यंत पोहोचला चेन्नईकडून जडेजाने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर इम्रान ताहीरने २, सॅम कुरेन, आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

तत्पूर्वी, चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस जोडीने चेन्नईला आश्वासक सुरूवात दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ९.१ षटकात ७४ धावांची सलामी दिली. युझवेंद्र चहलने गायकवाडला बाद करत ही जोडी फोडली. गायकवाडने २५ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह ३३ धावा केल्या. त्याचा झेल जेमिसनने टिपला.

डू प्लेसिस आणि सुरेश रैना या जोडीने चेन्नईला शतकी टप्पा गाठून दिला. तेव्हा हर्षल पटेलने एका षटकात चेन्नईला दोन धक्के दिले. त्याने चौदाव्या षटकातील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे सुरेश रैना आणि डू प्लेसिस याला बाद केलं. रैनाने २३ धावा केल्या. त्याचा झेल पडीक्कलने घेतला. तर डू प्लेसिसने ४१ चेंडूत ५० धावा केल्या. यात ५ चौकार आणि १ षटकारांचा समावेश आहे.

अंबाती रायुडूला (१४) देखील हर्षल पटेलने जेमिसनकडे झेल देण्यास भाग पाडलं. जडेजा आणि धोनी जोडीने चेन्नईला १९१ मजल मारून दिली. जडेजाने २८ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६२ धावांची खेळी केली. तर धोनी २ धावांवर नाबाद राहिला. बंगळुरूकडून हर्षल पटेलने सर्वाधिक ३ गडी बाद केले. पण अखेरच्या षटकात तो चांगलाच महागडा ठरला. त्याने या षटकात जडेजाला ३७ धावा बहाल केल्या. तर चहलने १ विकेट घेतली.

हेही वाचा - कौतूकास्पद! १९ वर्षीय गोल्फपटूने आपली कमाई दिली कोविड लसीकरण मोहिमेला

हेही वाचा - SRH VS DC : हैदराबाद-दिल्ली हेड टू हेड आकडेवारी आणि खास रेकॉर्ड

Last Updated : Apr 25, 2021, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.