ETV Bharat / sports

IPL २०२१ : चेन्नईच्या ताफ्यातही कोरोनाचा शिरकाव; ३ सदस्यांना लागण - चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ

चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बसचा क्लीनर यांना कोरोनाची लागण झाली आहे. या तिघांव्यतिरिक्त संघातील खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

ipl 2021 : CSK Bowling Coach Lakshmipathy Balaji And CEO Kasi Viswanathan Test COVID-19 Positive
IPL २०२१ : चेन्नईच्या ताफ्यातही कोरोनाचा शिरकाव; ३ सदस्यांना लागण
author img

By

Published : May 3, 2021, 3:46 PM IST

नवी दिल्ली - आयपीएलच्या चौदाव्या हंगामावर सध्या कोरोनाचे सावट गडद होत चालले आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघातील २ खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे त्यांचा आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणारा सामना तात्काळ स्थगित करण्यात आला. आता चेन्नई सुपर किंग्जच्या संघातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. चेन्नईच्या तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

एका इंग्रजी क्रीडा संकेत स्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बसचा क्लीनर यांना कोरोनाची लागण झाली आहे. या तिघांव्यतिरिक्त संघातील खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या सर्वांची शेवटची चाचणी रविवारी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल आता समोर आला आहे.

रविवारी काशी विश्वनाथ, बालाजी आणि बसचा क्लीनर यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आज (सोमवार) पुन्हा त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात देखील ते पुन्हा पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे ते संघाच्या बायो-बबलमधून बाहेर पडले आहे. पुढील १० दिवसांसाठी ते क्वारंटाइन झाले आहेत. दोन निगेटिव्ह चाचण्या येईपर्यंत त्यांना संघात प्रवेश मिळणार नाही.

कोलकाता-बंगळुरू सामना स्थगित

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. मात्र या सामन्यापूर्वी कोलकाताचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे आजचा सामना तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय आयपीएल प्रशासनाने घेतला. दरम्यान, बायो बबलमध्ये असताना देखील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आयपीएल प्रशासनासमोरील चिंतेत भर पडली आहे.

हेही वाचा - कोरोनाचे नियम धाब्यावर : चेन्नईला हरवल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा जल्लोष

हेही वाचा - केकेआरच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण; कोलकाता-बंगळुरूचा सामना रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.