नवी दिल्ली - आज आयपीएलच्या चौदाव्या हंगामात सनरायजर्स हैदराबाद संघासमोर बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेठली मैदानावर होणार असून या हंगामात दिल्लीच्या मैदानावर होणारा हा पहिला सामना आहे.
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा पहिला सलामीचा सामना गमावला. त्यानंतर त्यांनी सलग चार सामने जिंकले. गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानावर आहेत. आज हैदराबाद विरुद्ध विजय मिळवून चेन्नई विजय रथ पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादच्या संघाने पाच सामने खेळले आहेत. यात त्यांना फक्त एका सामन्यात विजय साकारता आला आहे. ते गुणतालिकेत तळाशी म्हणजे आठव्या स्थानी आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मागील सामन्यात हैदराबादचा सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला होता.
चेन्नईकडून फाफ डू प्लेसिस, रविंद्र जडेजा ऋतुराज गायकवाड फॉर्मात आहेत. तर सुरेश रैना आणि अंबाती रायडू मोठी धावसंख्या करू शकतात. धोनी देखील मोठे फटके मारण्यासाठी सक्षम आहे. गोलंदाजीत दीपक चहर, इम्रान ताहीर प्रभावी मारा करत आहेत. पण शार्दुल ठाकूरला अद्याप आपली छाप सोडता आलेली नाही. चेन्नईच्या फलंदाजांसाठी राशिद खान हे मोठे आव्हान असेल.
हैदराबादचा संघ फलंदाजीमध्ये कर्णधार डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो आणि केन विल्यमसन यांच्यावर सर्व काही अवलंबून आहे. हैदराबाद संघातील भारतीय खेळाडूंची कामगिरी हा काळजीचा विषय आहे. कर्णधार वॉर्नरला देखील खराब फॉर्ममधून जात आहे. त्याला मोठी खेळी करावे लागेल. हैदराबादकडे राशिदच्या रुपाने प्रमुख अस्त्र आहे. ही जमेची बाजू आहे. हैदराबादला दीपक चहर, इम्रान ताहीर, जडेजा आदी गोलंदाजांचा सामना करायचा आहे.
यातून संघ निवडणार -
- चेन्नई सुपर किंग्ज - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डू प्लेसिस, इमरान ताहीर, एन जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एनगिडी, मिचेल सँटनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड़, शार्दुल ठाकुर, सॅम कुरेन, आर साई किशोर, मोईन अली, के गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा आणि सी हरी निशांत.
- सनरायजर्स हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), केन विल्यमसन, जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, ऋधिमान साहा, प्रियम गर्ग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, विराट सिंह, जेसन होल्डर , मोहम्मद नबी, राशिद खान, शाहबाज नदीम, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्दार्थ कौल, बासिल थम्पी, जगदीश सुचित, केदार जाधव आणि मुजीब-उर-रहमान.
हेही वाचा - निर्धास्त व्हा, तुम्हाला सुरक्षित घरी पोहोचवेपर्यंत आमच्यासाठी स्पर्धा संपलेली नाही - बीसीसीआय
हेही वाचा - जिंकलस भावा! ब्रेट ली याने भारताला ऑक्सिजन खरेदीसाठी दिली ४२ लाखांची मदत