ETV Bharat / sports

CSK VS RCB : नाणेफेक जिंकून चेन्नईचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

आयपीएल २०२१ च्या हंगामात आज डबल हेडरमधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगला आहे.

IPL 2021 : Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore toss report
LIVE CSK VS RCB : नाणेफेक जिंकून चेन्नईचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
author img

By

Published : Apr 25, 2021, 3:02 PM IST

Updated : Apr 25, 2021, 3:15 PM IST

मुंबई - आयपीएल २०२१ मध्ये आज डबल हेडरमधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी एकमेकांसमोर आहेत. यंदाच्या हंगामात आतापर्यंत बंगळुरूने चारही सामने जिंकलेले आहेत, तर चेन्नईने गेल्या तीन सामन्यांत विजय मिळवून आपलीही गाडी रुळावर आणलेली आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नईने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. त्यांनी मोईन अली आणि लुंगी एनगिडी यांच्या जागेवर ड्वेन ब्राव्हो आणि इम्रान ताहीर यांना अंतिम संघात स्थान दिलं आहे. दुसरीकडे बंगळुरू संघाने देखील दोन बदल केले आहेत. त्यांनी नवदीप सैनी आणि डॅनियल सॅम्स यांना संधी दिली आहे.

चेन्नई-बंगळुरू हेड टू हेड आकडेवारी -

उभय संघातील हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास चेन्नईचा पगडा भारी आहे. चेन्नईने १७ सामन्यात विजय मिळवला आहे. तर बंगळुरूचा संघ ९ सामन्यात विजयी ठरला आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ -

एमएस धोनी (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, अंबाती रायुडू, सॅम कुरेन, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर आणि इमरान ताहीर.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -

विराट कोहली (कर्णधार), देवदत्‍त पडीक्‍कल, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, वॉशिंग्टन सुंदर, डॅनियल सॅम्स, कायले जेमिसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल.

हेही वाचा - झारखंडच्या शेतकऱ्याच्या मुलीला हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती; प्रियंका चोप्राने केलं कौतूक

हेही वाचा - KKR VS RR : राजस्थानचा कोलकातावर 6 विकेट्सने विजय

Last Updated : Apr 25, 2021, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.