ETV Bharat / sports

IPL-2021 CSK VS RR : चेन्नईचा राजस्थानवर 45 धावांनी दणदणीत विजय

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने निर्धारित २० षटकात ९ बाद १८८ धावा करत राजस्थानसमोर विजयासाठी १८९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

IPL 2021 : Chennai Super Kings vs Rajasthan Royals match updates
LIVE CSK VS RR : राजस्थानने नाणेफेक जिंकली, चेन्नईची फलंदाजी
author img

By

Published : Apr 19, 2021, 7:03 PM IST

Updated : Apr 19, 2021, 11:38 PM IST

मुंबई - आयपीएल २०२१ मधील १२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने आले होते. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने निर्धारित २० षटकात ९ बाद १८८ धावा करत राजस्थानसमोर विजयासाठी १८९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. तर, चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सवर 45 धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली आहे.

चेन्नईचा डाव -

चेन्नईकडून फाफ डू प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायुडू व सुरेश रैना यांनी चांगली कामगिरी करत सीएसकेसाठी मजबूत पायाभरणी केली. मात्र राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत चेन्नईच्या धावांवर अंकूश लावला. महेंद्रसिंग धोनी आज चांगल्या लयीत दिसत असताना पुन्हा एकदा खराब फटका मारून बाद झाला. धोनी व रवींद्र जडेजा यांच्याकडे ६ षटके खेळण्यासाठी असतानाही त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दोघांनी २१ चेंडूंत केवळ २२ धावांची भागीदारी केली.राजस्थानकडून चेतन सकारियाने तीन महत्त्वाच्या विकेट्स घेत चेन्नईला बॅकफूटवर ढकलले.

सलामीवीर ऋतुराज गायकवाडने पुन्हा एकदा निराशा केली. केवळ १० धावांवर तो माघारी परतला. डू प्लेसिसने जयदेव उनाडकटच्या पाचव्या षटकात तीन चौकार व एक षटकार खेचत १९ धावा केल्या. ख्रिस मॉरिसने डू प्लेसिसला ३३ धावांवर बाद करत मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर मोईन अलीने काही आक्रमक फटके मारले. पण राहुल तेवतियाच्या फिरकीवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. अलीनं २० चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २६ धावा केल्या.

३ बाद ७८ अशा अवस्थेत असताना चेन्नईचे सर्वात अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू व सुरेश रैना खेळपट्टीवर होते. रायुडूचा परतलेला फॉर्म चेन्नईसाठी सुखावणारा ठरला. त्यानं १७ चेंडूंत ३ षटकारांसह २७ धावा करत चौथ्या विकेटसाठी रैनासह २६ चेंडूंत ४५ धावा जोडल्या. चेतन सकारीयाने त्याची विकेट घेतली. त्याच षटकात संजू सॅमसन याने रैनाला धावबाद करण्याची सोपी संधी गमावली. पण, चेतननं सुरेख गोलंदाजी करताना सुरेश रैनाला १८ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले.

चेन्नईनं १४ षटकांत ५ बाद १२५ धावा केल्या होत्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनी व रवींद्र जडेजा ही जोडी खेळपट्टीवर असल्याने चेन्नईला मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. पण धोनी आजही चाचपडताना दिसला. धोनी व जडेजा जोडीने १७ चेंडूनंतर पहिला चौकार मारला. धोनीने १७ चेंडूंत १८ धावा केल्या.

राजस्थानकडून चेतनने ३६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. जडेजा ६ चेंडूंत ८ धावा करून ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. शेवटच्या षटकात सॅम करन धावबाद झाला. ड्वेन ब्राव्होने नाबाद ८ चेंडूत नाबाद २० धावांचे योगदान दिल्याने चेन्नईला २० षटकांत ९ बाद १८८ धावा करता आल्या.

उभय संघातील हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास यात चेन्नईचा संघ वरचढ असल्याचे दिसून येते. दोन्ही संघ आतापर्यंत २३ वेळा आमने-सामने आले आहेत. यात चेन्नईने १४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानचा संघ ९ सामन्यात विजयी ठरला आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ -

ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, सुरेश रैना, मोइन अली, अंबाती रायुडू, सॅम कुरेन, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर.

राजस्थान रॉयल्सचा संघ -

जोस बटलर, मनन व्होरा, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, चेतन सकारिया आणि मुस्तफिजूर रहमान.

हेही वाचा - IPL २०२१ : आतापर्यंत पाहिलेलं हे सर्वात विचित्र नेतृत्व, गंभीरने मॉर्गनला फटकारलं

हेही वाचा - RCB VS KKR : फलंदाजीदरम्यान मॅक्सवेल डिव्हिलियर्सवर रागावला; एबीने सांगितलं कारण

Last Updated : Apr 19, 2021, 11:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.