दुबई - किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या शनिवारी झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाने हैदराबादवर १२ धावांनी मात केली. पंजाबच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १२७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, या आव्हानाचा हैदराबादला पाठलाग करता आला नाही. या विजयानंतर पंजाबचा कर्णधार केएल राहुलने प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्या संघाला जिंकण्याची सवय होत आहे, जी स्पर्धेच्या पहिल्या सत्रात नव्हती. कमी धावसंख्येच्या सामन्यात मला 10-15 धावांचे महत्त्व माहित आहे. या विजयामध्ये केवळ खेळाडूंचेच नाही, तर सहायक कर्मचाऱ्यांचे देखील योगदान आहे. अशी प्रतिक्रिया किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने सामना संपल्यानंतर दिली.
मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनंतर पंजाबने शनिवारी सनरायझर्स हैदराबादला 12 धावांनी पराभूत केले. या विजयानंतर पंजाबचा संघ गुणतालिकेत 11 गुणांसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.