अबुधाबी - कोलकाता नाईट रायडर्सचे (केकेआर) कर्णधारपद स्वीकारल्यानंतर पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जाणाऱ्या इयान मॉर्गनला आज आयपीएलध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झुंजावे लागणार आहे. सततच्या खराब कामगिरीमुळे दिनेश कार्तिकने शुक्रवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी कर्णधारपद मॉर्गनकडे सोपवले. आजचा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल.
कोलकाताने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत. तर, तेवढ्याच सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) नंतर ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे, हैदराबादने आठ सामन्यांत केवळ तीन सामने जिंकले असून ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू मिशेल मार्श दुखापतीतून बाहेर पडल्याने गोलंदाजीबाबत हैदराबाद संभ्रमावस्थेत आहे. अव्वल फळीतील फलंदाज जॉनी बेअरस्टो, कर्णधार डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे आणि केन विल्यमसन यांच्यावर संघाची भिस्त आहे. फिरकीपटू राशिद खानवर संघाच्या फिरकीची मदार आहे.
कोलकाता नाइट रायडर्स -
दिनेश कार्तिक, इयान मॉर्गन (कर्णधार), नितीश राणा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंग, शुबमन गिल, सिद्धेश लाड, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, ख्रिस ग्रीन, एम. सिद्धार्थ, सुनील नारायण, निखिल नाईक, टॉम बँटन.
सनरायझर्स हैदराबाद -
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, श्रीवत गोस्वामी, विराट सिंग, प्रियम गर्ग, रिद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी. संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन अॅलन, पृथ्वीराज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, बासिल थंपी.